आज आपल्या गावात

0
 गोकुळअष्टमी उत्सवानिमित्त श्रीदत्त साधकाश्रम येथे अखंड नामचिंतन जप सप्ताहात श्रीपाद महाराज भडंगेशास्त्री यांचे कीर्तन स्थळ – श्री दत्त साधकाश्रम देवस्थान ट्रस्ट, चांदा ता. नेवासा     वेळ – रात्री 10 वाजता
संत ज्ञानेश्‍वर जयंती निमित्त हरिनाम सप्ताहात दिंडी सोहळा व शिवाजी महाराज देशमुख यांचे श्रीकृष्ण जयंतीनिमित्त कीर्तन स्थळ – श्री ज्ञानेश्‍वर मंदिर नेवासा     वेळ – दुपारी 4 व रात्री 10 वाजता
शेतकर्‍यांचे कर्ज विनाअट माफ करा मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी पक्ष, शेतकरी संघटना,स्वाभिमानी शेतकरी पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, सुकाणू समिती, आदींच्यावतीने चक्काजाम स्थळ – वडाळा बहिरोबा ता. नेवासा     वेळ – सकाळी 11 वाजता
अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळ्यानिमित्त अमोल महाराज बडाख यांची कीर्तन स्थळ – ममदापूर, ता. राहाता     वेळ – रात्री 10 वाजता
अखंड हरिनाम सप्ताह श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा होईल. काकडा भजन, नवनाथ पारायण भजन, पवचन, हरिपाठ स्थळ – घाटशिरस, ता. पाथर्डी     वेळ – पहाटे 4 वाजेपासून
वै. सदगुरू भाऊरावबाबा पोटे यांच्या समाधिस्थळाजवळ अखंड हरिनाम सप्ताह व पारायण सोहळ्यनिमित्त कीर्तन स्थळ – मोरया चिंचोरे, ता. नेवासा     वेळ – सायंकाळी 7
गोरक्षक हल्ला प्रकरणी काष्टी ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा स्थळ – जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर     वेळ – सकाळी 10
श्रीकृष्ण जन्माष्टनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहात कीर्तन स्थळ – रोकडोबा देवस्थान, पिंपरी जलसेन, ता. पारनेर     वेळ – सकाळी 7 वाजेपासून
भगवान जिव्हेश्‍वर जयंती सोहळ्यात सूरश्री वाद्यवृंद समूहाची भजनसंध्या स्थळ – संगमनेर     वेळ – सायंकाळी 7
माजी खा. शंकरराव कोल्हे यांना आबासाहेब वीर पुरस्कार व पोपटराव पवार यांना प्रेरणा पुरस्कार. माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्या हस्ते. स्थळ – सातारा     वेळ – सकाळी 11
शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन स्थळ – शिवाजी चौक, राहाता     वेळ – सकाळी 10
श्रीकृष्ण जन्माष्टमिनिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहामध्ये भागवताचार्य देवी वैभवी यांची भागवत कथा स्थळ – श्री हनुमान मंदिर, खोकर     वेळ – रात्री 9

LEAVE A REPLY

*