आश्रमशाळेवर वीज पडून तीन विदयार्थी जखमी

0
त्र्यंबकेश्वर । यंबकेश्वर तालुक्यातील चिंचवड येथील शासकीय आश्रम शाळेत परीक्षा सुरू असताना वर्गावर अचानक वीज कोसळून तीन शालेय विद्यार्थी जखमी झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली़ यामध्ये दोन विद्यार्थी व एक विद्यार्थिनी असे तिघे असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत़ मात्र विज वृक्षावर कोसळली असून विद्यार्थी केवळ घाबरले असल्याचा दावा शालेय प्रशासनाने केला आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिंचवड येथे कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालय आहे़ या विद्यालयातील विद्यार्थ्यांची प्रथम सत्राची लेखी परीक्षा सुरू असून, मंगळवारी दुपारच्या सुमारास नववी व दहावीचे विद्यार्थी नेहमीप्रमाणे पेपर सोडवित होते़ पेपर सुरू असताना आकाशात अचानक ढगांचा कडकडाट होऊन पावसाला सुरुवात झाली़.

काहीवेळात अचानक विज समोरल झाड व छतावर कोसळली. यावेळी शाळेतील खोलीमध्ये खिडकीजवळ पेपर सोडवित असलेले विमल सदू खणझोडे (15, मूळ मु़ वरसईल, पो. खरवळ, ता़ त्र्यंबकेश्वर ज़ि नाशिक), महेश नामदेव चौधरी (15, मु़ निरगुडे, पो़ हरसूल, ता़ त्र्यंबकेश्वर ज़ि नाशिक) व प्रवीण सुभाष घाटाळ (16, राज़ातेगाव, ता़त्र्यंबकेश्वर, ज़ि नाशिक) हे तिघे विद्यार्थी खाली कोसळले.

या तिघांना शालेय व्यवस्थापनाने तत्काळ हरसूल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून, या तिघांवर उपचार सुरू आहेत़ दरम्यान, यापैकी दोघांना अधिक त्रास मात्र यामध्ये जखमी कोणी झाले नाही. केवळ ते घाबरल्याने असे घडल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले़.

LEAVE A REPLY

*