मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा हा आहे सर्वात ‘बेस्ट शॉट’

0

नाशिक, ता. ७  : जगभरातील क्रिकेटमैदानावर दमदार खेळी करणाऱ्या सर्वांच्या लाडक्या क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरचा बेस्ट शॉट कोणता? असे विचारले, तर मुंबई पोलिस त्याचे वेगळेच उत्तर देतील, ज्यामुळे आपल्याला अभिमानच वाटेल.

नुकताच ट्विटरवर सचिन तेंडूलकरने आपला एक फोटो प्रकाशित केला आहे. त्यात तो कार चालविताना दिसत असून त्याने सीटबेल्ट लावलेला आहे.

रस्ते सुरक्षा आणि सीट बेल्टचे महत्त्व आपल्या चाहत्यांना सांगण्यासाठी सचिनने मुद्दामहून हा फोटो टाकला आहे. त्याला आतापर्यंत २ हजाराच्या आसपास रिट्वीट मिळाले, तर ३२ हजाराहून जास्त लोकांनी लाईक केले आहे.

मुंबई पोलिसांनीही हा फोटो रिट्विट केला असून हा सचिन तेंडुलकरचा सर्वात बेस्ट शॉट असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दुचाकी धारकांनी हेल्मेट वापरणे आणि चारचाकी वाहनधारकांनी सीटबेल्ट वापरणे हे आवश्यक असून अपघाताच्या वेळेस अनेकांचे जीव त्यामुळे वाचलेले आहेत. याचेच महत्त्व आता सचिनही सामान्यांना पटवून देत आहे.

LEAVE A REPLY

*