कर्जमाफीला पर्याय नाही, सर्व विरोधकांनी भूमिका घेतली पाहिजे – शरद पवार

0
मुंबई | विरोधी पक्ष नेत्यांची दिल्लीत जी बैठक झाली त्यात राष्ट्रपीत निवडणुकी संदर्भात शरद पवारांनीच असा प्रस्ताव ठेवला की सध्या  कोणतेही नाव निश्चित करु नये,

सरकारी बाजू कडून सुसंवाद केला जातो का याची वाट पाहावी आणि नंतर आवश्यकता असल्यास प्रमुख नेत्यांनी विरोधी पक्षांच्या राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवावा.

स्वतः शरद पवार यांनीच आज पत्रकार परिषदेत ही माहिती जाहीर केली. ते म्हणाले की माझ्या नावाचा प्रश्न नाही. पण देशाचे राष्ट्रपतीपद हे संविदानतील सर्वश्रेष्ठ पद आहे.

त्यासाठी हे नाव की ते नाव असी चर्चा सध्या करू नये अशी भूमिका मी सोनिया गांधींनी बोलावलेल्या बैठकती सुरवातीलाच मांडली व ती सर्वांनी मान्य केली असे ते म्हणाले. पवारांनी अशीही टिप्पणी केली की तुमच्याकडे बातम्या नसतात तेंव्हा तुम्ही माझ्या नावाची चर्चा करता पण राजकीय वस्तुस्थितीचे भान असणाऱ्या माझ्यासारख्या नेत्याला जाणीव आहे.

श्री पवार यांनी नरेंद्र मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर टीका केली. देशात सध्या दरवर्षी बारा हजार शेतकरी आत्महत्या करत आहेत ही वस्तुस्थिती सरकारनेच सर्वोच्च न्यायालयापुढे मांडली आहे. त्या संदर्भात कर्जमाफी हा एक चांगला उपाय आहे. पण पंतप्रधान देशाच्या स्तरावर निर्णय़ न करता उत्तरप्रदेशात निवडणूक आश्वासन देतात. तेथील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी आल्या आल्याच तो निर्णय  केला हे चांगले झाले.

पण मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्नाटकाच्या शेतकऱ्यांना पंजाबी शतेकऱ्यांना त्याचा लाभ का मिळू नये सरकारने देशस्तरावर निर्णय करण्यासाठी विरोधी पक्षांनी भूमिका घेतली पाहिजे ही बाब मी विरोधी नेत्यांपुढे त्या बैठकीत मांडली असेही पवार म्हणाले. त्यांनी असेही सांगितले की मनमोहनसिंग पंतप्रधान होते. तेंव्हा मी त्यांना आग्रह केला ते शेतकरी आत्महत्यांची माहिती घेण्यासाठी महाराष्ट्रात आणले. त्यानंतर आम्ही देशस्तरावर ७१ हजार कोटींची कर्ज माफी शेतकऱ्यांना दिली. त्याचा चांगला परिणाम झाला.

त्या आधी शेती कर्जाचे वितरण फक्त ८६ हजार कोटी होते. कर्जमाफी नंतर हे शेती कर्जवाटप थेट सात लाख कोटी रुपयांवर गेले असे सांगून पवार म्हणाले की त्या नंतरच्या काळात शेतकऱ्यांनी देशातील शेती उत्पादनाची क्रांती केली. तांदळात जगातील एक क्रमांकाचा निर्यातदार देश बनला तर गहु, साखर व कापसाचा जगातील क्रमांक दोनचा निर्यातदार देश भारत बनला.

महाराष्ट्रात शेतकरी अधिक अडचणीत आहे कारण चांगल्या पावसाची शक्यता व्यक्त झालेली असतानाही शेतीकर्जाचे वाटप नाही. कारण नोट बंदीचा मोठा फटका जिल्हा बँकांना बसला आहे. त्यांचे आठ हजार कोटी रुपये जुन्या नोटांत अडकून पडलेले आहेत त्यांना त्या रकमेचे व्याज नाही, त्यावरचा विम्याचा खर्चही नाही. ते कसे काय पुढे कर्ज वाटप करतील असाही सावल पवारांनी केला. ते म्हणाले की मी या मुद्द्यावर केंद्रीय  अर्थमंत्र्यांना भेटलो पण त्यांनी मदतीची भूमिका घेतलेली नाही.

LEAVE A REPLY

*