मेडिकलचे कुलूप तोडून लॅपटॉप व चिल्लर लंपास

0

डुबेरे (ता.सिन्नर) | येथे भरवस्तीत मध्यरात्री चोरी झाली. येथील वरची वेस भागातील विकास कुंदे यांच्या मालकीचे तुलसी मेडिकलचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने लॅपटॉप व जवळपास 2 हजार रुपयांची चिल्लर चोरून पोबारा केला.

तसेच लोकनेते पतसंस्थेलगत असणारे तलाठी कार्यालयाचे कुलूप तोडण्यात आले. कार्यालयात घुसून बँक फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

दरम्यान घटनेची माहिती पोलिसांनी दिल्यानंतर पोलीस यंत्रणा दाखली झाली असून पुढील तपास सुरु असल्याचे प्रतिनिधीकडून समजते.

LEAVE A REPLY

*