मालेगावात राज्यमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात चोरी

0

मालेगाव (प्रतिनिधी) :- राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयामध्ये काही अज्ञात चोरट्यांनी   खिडकीद्वारे प्रवेश केला.

त्यानंतर चोरट्यांनी सी.सी.व्ही कॅमेरे फोडून कार्यालयातील  कागदपत्रे, बक्षिसे, भेटवस्तू आदी साहित्य लंपास केले आहेत.

चोरीचा  हा प्रकार सकाळी उघडकीस आल्याने परिसरात नागरिकांमध्ये  खळबळ उडली आहे.

भुसे, यांच्या कार्यालयातील हरिष देवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून छावणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अवैध धंद्या विरोधात मागील काही दिवसापासून शहरात- तालुक्यात धडक मोहीम सुरु आहे, तरी देखील  शहरात चोऱ्यांचे सत्र सुरु थांबलेले नाही.

मध्यवर्ती ठिकाणी असलेले राज्य मंत्र्यांचे कार्यालय फोडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर स्थानिक नागरीकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

LEAVE A REPLY

*