वाहनचालकांची लूट : कोपरगावची टोळी गजाआड

0

लासलगाव – मंगळवारी पहाटे साडे बारा वाजण्याच्या सुमारास डिझेल संपल्याने उभ्या असलेल्या भगूर येथे दोन मोटार सायकलवरून आलेल्या पाच दरोडेखोरांनी क्वालीस वाहनावर दरोडा टाकीत तीन हजार 900 रुपयांची लूट केली. पाच पैकी चार दरोडेखोरांना अवघ्या दोन तासांत पकडण्यात पोलिसांना यश आले.

औरंगाबाद येथुन संदल करून भगुर किराणा व्यवसायिक फारूक अमीन शेख (55) हे आपल्या इतर चार नातेवाईकांना सोबत घेऊन भंगुर येथे निघाले असता रात्री बारा विजेच्या सुमारास डिझेल संपले. डिझेल संपल्यानंतर औरंगाबाद हमरस्त्यावर लासलगाव पोलीस कार्यालयाचे हद्दीतील भरवस फाटा परिसरातील पाटीलवाडा या हॉटेलसहजवळ उभी करून चालक गाडीतील एकासह डिझेल आणण्यास गेले असता एम एच 15 बी डब्ल्यू 5669 या गाडीवर दरोडा टाकीत मोटार सायकल वरून आलेल्या पाच जणांनी 1900 रूपये रोख व नोकिया व सॅमसॅग कंपनीचे दोन हजार रूपयांची मोबाईल व आतील आयडीया व टाटा डोकॅमो कंपनीचे सिमकार्ड यांची लुट करीत पसार झाले. या दरम्यान सचिन जाधव या तरूणाने मदतीला येऊन प्रतिकार केला असता चाकू हल्ल्यात त्याच्या हाताला दुखापत झाली. याबाबत माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे

हे अवघ्या पंधरा मिनीटात पोलिस जीपने पोहचले. लूट करणार्‍यांची माहिती घेऊन पाठलाग सुरू केला असता विंचुर येथील एमआयडीसीजवळ हिरो होंडा मोटारसायकल नेमप्लेटला चिखल लावून चाललेल्या गाडी क्रमांक एमएच 17 एएक्स 3749 या सह पाचशे पन्नास रूपये व सॅमसॅग कंपनीचा मोबाईल व मोटार सायकल जप्त करून राजेश भानुदास अभंगे वय (24) रा खिल्ली गणेश ता .कोपरगाव, जिल्हा.अहमदनगर व आकाश भाऊसाहेब म्हस्के (20) रा.खिर्डी गणेश ता . कोपरगाव यांना ताब्यात घेतले असता इतर साथीदार यांची माहिती घेऊन कृष्णा दिलीप लोंढे (22) रा .खिल्लारी वस्ती ब्राम्हणगाव (ता. कोपरगाव) व शुभम सुरेश वाभुळ (21) रा. ब्राह्मणगाव रोड, येसगाव (ता.कोपरगाव,जि.अहमदनगर ) यांना येसगाव येथून पोलिस पथकाने पकडले.

LEAVE A REPLY

*