उन्हाने त्वचा काळवंडली आहे ना…मग हे कराच

0

ऋतू बदलला त्वचेचा रंगही बदलतो. त्यामुळे अनेकजण उन्हाळ्यात त्वचा काळी पडू नये म्हणून अनेक उपाययोजना करतांना दिसतो.

हिवाळ्यात व पावसाळ्यात त्वचा कोरडी पडते तर उन्हाळ्यात काळी त्वचा पडते. त्यामुळे या तिन्ही ऋतुमध्ये त्वचेची वेगवेगळ्या पद्धतीने काळजी घेणे गरजेचे असते.

मे महिना सुरु असल्यामुळे सध्या सर्वत्र उन्हाची तीव्रता वाढलेली आहे. म्हणून उन्हापासून त्वचा काळवंडू नये यासाठी खाली दिलेल्या टिप्स वाचा आणि आत्मसात करा.

 • शरीरातील पाणी कमी होऊ नये यासाठी भरपूर पाणी प्यावे.
 • भरपूर पाणी असणारी फळे खावेत. टरबूज, खरबूज, लिची यासारखे फळे उन्हाळ्यात खावीत.
 • शुष्क त्वचेसाठी चांगल्या स्क्रब क्रीमने मसाज करावी.
 • दिवसातून 3 ते 4 वेळा चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा.
 • उन्हाळ्यात जास्तीत जास्त सुती कपडे वापरण्यावर भर द्यावा.
 • महिला आणि युवती उन्हापासून बचाव करण्यासाठी सनकोट किंवा सुती स्टोल वापरावा.
 • साबण, हार्ड ब्युटी प्रॉडक्ट, अति गरम पाणी यापासून त्वचेचे संरक्षण करावे.
 • कडक उन्हात बाहेर जाण्याच्या 15 मिनिटे अगोदर त्वचेवर सन्सक्रीम लावा.
 • उन्हाळ्यात चेहर्‍यावर ब्लिचिंग करू नये त्यामुळे त्वचा काळी पडण्याची शक्यता असते.
 • आठवड्यातून एकदा प्राकृतिक फेसपॅक जसे की हळदी फेसपॅक, चंदन फेसपॅक, एलोवेरा फेसपॅक बनवून चेहर्‍याची चमक कायम ठेवता येते.
 • टोमॅटो, काकडी, संत्री, मोसंबीचे फ्रिजरमध्ये आईसक्युब तयार करून त्यानेही चेहर्‍याचा मसाज केल्याने त्वचा उजळते.

LEAVE A REPLY

*