सावतानगरला पाईपलाईन फुटली; हजारो लिटर पाणी वाया

0
नवीन नाशिक : सिडको येथील  सावतानगर रस्त्याचे काम सुरू  असताना पाइपलाईन फुटून हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहून वाया गेले.

सकाळी १० वाजेच्या सुमारास क्रेनने डांबरी रस्त्याचे खोदकाम सुरु असताना सावतानगर येथील अहिल्याबाई होळकर चौकात रस्त्यालगत असलेली पाईप लाइन फुटल्याने पाणी अर्ध्या किलोमीटर पर्यंत ओसंडून वाहत आहे.

रस्त्याचे काम सुरु असल्याने हा रस्ता बंद करण्यात आला होता. मात्र दुचाकीस्वार ह्या रस्त्याचा सर्रास वापर सुरु होता. आता मात्र पाणी साचल्याने रस्ता पूर्णत: बंद करण्यात आला आहे.

 

LEAVE A REPLY

*