येत्या सोमवारी बारावीच्या निकालाची तारीख होणार जाहीर

0
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकाला बाबत महत्वपूर्ण घोषणा दिनांक 29 मे रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ करणार आहे.

बारावी निकालाबाबत गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर बारावीच्या निकालाच्या तारखांना उधान आले होते.

मात्र त्या सर्व अफवा असल्याचे मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हम्हाणे यांनी सांगितले. त्यामुळे पालकांच्या मनात संभ्रमाचे वातावरण होतं.

मात्र, आता बोर्ड सोमवारी  निकालाची तारीख जाहीर करणार आहे.

 

LEAVE A REPLY

*