नांदगाव तालुक्यात वधूपित्याने केली आत्महत्या; परिसरात खळबळ

0
नांदगांव | दोन दिवसापूर्वी मुलीचे लग्न झालेल्या वधू पित्याने तालुक्यातील वेहळगाव येथील सासरवाडीला जाऊन झाडाला गळफास घेत आत्महत्या केली, या घटनेने परीसरात एकच खळबळ उडाली आहे.

वेहळगाव येथील सासरवाडी असलेले वधुपिता उमेश राजेंद्र खेडकर (वय ५०, रा. पारेगांव जि. बिड) यांनी मुलीच्या लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी वेहळगाव येथे गळ्यातील पागोट्याने झाडाला गळफास घेऊन जीवन संपविले.

वधूपित्याने आपल्या मुलीचे लग्न दोन दिवसांपूर्वीच वेहळगाव येथे थाटामाटात लग्न लाऊन दिले. लग्नातील व-हाडी मंडळी वधुचे मामा रत्नाकर शेरेकर यांच्याकडे मुक्कामी होते. सकाळी उठल्यानंतर राजेंद्र खेडकर हे दिसत नसल्याने त्यांची शोधाशोध सुरु झाली.

त्यानंतर गावातील काही लोकांना गावाजवळील एका शेतातील झाडाला आहेराच्या फेट्यानेच फाशी घेतल्याचे दिसून आले. यानंतर वधुचे मामा शेरेकर यांना बोलवून त्यांनी ते वधुचे पिता राजेंद्र असल्याचे सांगितले. यानंतर त्वरीत नांदगाव पोलिसांना माहिती देण्यात आली.

ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला व पंचनामा करुन आकस्मित मृत्यूची करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*