रस्ता सुरक्षेसाठी कठोर निर्णय घ्यावा

0
अहमदनगर (प्रतिनिधी)- रस्ता सुरक्षेचे महत्व ओळखून केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय स्तरावरील रस्ते सुरक्षा समितीची स्थापना केली आहे. जिल्ह्यात प्रतिवर्षी सुमारे 1 हजार 700 नागरिकांचा अपघातात मृत्यू होतो. या अपघातांना करणे वेगवगळी असली तरी रस्ता सुरक्षा महत्वाची आहे.
प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहणे जरुरीचे आहे. महामार्गावर होणारे अपघात टळावेत, तसेच प्रमाण घटावे यासाठी आता रस्ता सुरक्षा समिती प्राधान्य देणार आहे. यासठी काही काठोर निर्णय घेऊन ठोस पावले उचणार आहोत, असे प्रतिपादन रस्ते सुरक्षा समितीचे जिल्हाध्यक्ष खा.दिलीप गांधी यांनी केले.
जिल्हास्तरीय रस्ते सुरक्षा समितीची पहिली बैठक खा. दिलीप गांधी यांच्या अध्यक्षते खाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस खा. सदाशीव लोखंडे, प्रभारी जिल्हाधिकारी विश्वजित माने, अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक घनशाम पाटील, उप प्रादेशिक परीवहन अधिकारी दीपक पाटील (नगर) व अशरफ खान (श्रीरामपूर), अधिक्षक अभियंता पी.बी. भोसले आदींसह सर्व वीभागांचे वरिष्ट अधिकारी उपस्थित होते.
खा. गांधी पुढे म्हणाले, रस्ते सुरक्षा समितीची आज पहिली बैठक होत आहे. या बैठकीन काही महत्वाचे निर्णय घेयचे आहेत. त्यानुसार नगर ते टेंभू्रणी मार्गावरून मोठ्या प्रमाणत दिंड्या जात असतात, म्हणून हा पालखी मार्ग म्हणून विकसित करायचा आहे. हा रस्ता 5 पद्री करण्याचा पहिला ठराव या बैठकीत करू. तसेच महामार्गाच्या कडेला झालेल्या अतिक्रमणामुळे मोठ्याप्रमाणात अपघात होतात.
अधिकारींचा धाक कमी झाला आहे त्यामुळे रस्त्यांवर अतिक्रमणांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे महामार्गावरील अतिक्रमणे काढण्यास समिती प्राधान्य देणार आहे. नगर शहरातून जाणारे सर्व रस्ते आता राष्ट्रीय महामार्गात वर्ग झाली आहेत. त्यामुळे सर्व रस्ते आता चौपदरी होत आहेत. अशा परिस्थितीत प्रशास्नाने या कडे गांभीर्यपूर्वक पाहावे.
केंद्र व राज्य सरकार कडून कोणकोणत्या सुविधांची गरज आहे या बाबत माहिती द्यावी अशा सुचना यावेळी खा.गांधी यांनी केली.
यावेळी खा.सदाशिव लोखंडे यांनीही त्यांच्या मतदार संघातील रस्ते सुरक्षा बाबत महत्वाच्या सुचाना अधिकारीनंना करून उपाय योजना राबवण्या बाबत आदेश दिले. प्रारंभी दीपक पाटील यांनी प्रास्ताविकात समितीच्या कामा बद्दल माहिती दिली.

LEAVE A REPLY

*