शेतकरी कर्जमुक्त करा, आम्ही तुम्हाला पूर्ण सत्ता देतो – उद्धव ठाकरे

0

नाशिक : शेतकरी प्रश्नावर लढत राहू. शिवसेनेचा समुद्धी महामार्गाला विरोध असून हा महामार्ग शेतकऱ्यांवर वरवंटा फिरवून केला जात आहे. रावसाहेब दानवे मुळे टाळपायतील आग मस्तकात गेली असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.

शेतकरी कर्जमुक्त करा आम्ही तुम्हाला संपूर्ण सत्ता देतो असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. ते शिवसेना आयोजित कृषी अधिवेशनात शेतकऱ्यांना संबोधित करत आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे

बळीराजाला साले म्हणण्याची वेळ यांच्यावर आली तरी कशी?
कर्ज मुक्ती द्या आम्ही तूम्हाला पूर्ण सत्ता देऊ.
सर्वे करण्यापेक्षा परिस्थिती लक्षात घ्या.
एकतर्फी मन की बात आम्ही ऐकून घेणार नाही.

तुर डाळीमुळे शेतकरी मेटाकुटीस आणि सरकार सत्तातुर झाले आहे.
शेतकऱ्यांना विसरून सदाभाऊ का तिकड़े जाऊन बसले?
डाळ आयात करून शेतकऱ्यांना अडचणीत आणणारे सरकार गुन्हेगार
समुध्धी मार्ग दोन्ही राजधानी जोडणार पण शेतकऱ्यांना अडचणीत आणून कसला हवा हा मार्ग?

कर्जमुक्तीची मागणी हा शेतकऱ्यांचा हक्क आहे.
15 लाख प्रत्येकाच्या खात्यात टाकणारे मग शेतकरी खात्यात का नाही टाकत.

LEAVE A REPLY

*