समलैंगिक विवाहांना मान्यता देणारा ‘तैवान’ आशियातील पहिला देश ठरणार?

0

जगभरात समलैंगिक विवाहांचा विषय मोठा चर्चेत असताना तैवानमध्ये या गोष्टीला मान्यता मिळण्याची शक्यता आहे.

तसे झाल्यास समलैंगिक विवाहास मान्यता देणारा तैवान हा आशिया खंडातील पहिला देश ठरणार आहे. तैवानमधील न्यायालयात या विषयावर आज निर्णय होणार आहे.

स्थानिक वेळेनुसार दुपारी चार वाजता या निर्णयाचा निकाल लागणार असून तो ऑनलाईन पोस्ट केला जाईल असे येथील संबंधित यंत्रणेने कळविले आहे.

आशियाई देशांच्या आणि जगाच्याही दृष्टीने हा अतिशय महत्त्वपूर्ण निकाल असल्याने त्याकडे सर्व जगाचे लक्ष लागून राहीले आहे.

या न्यायलयीन प्रकरणासाठी तैवानमध्ये १४ जणांच्या वरिष्ठ न्यायधीशांचे पॅनेल करण्यात आले आहे. ते सर्व गोष्टींचा योग्य तो अभ्यास करुन निर्णय देतील, असे सांगितले जात आहे.

LEAVE A REPLY

*