स्वाईन फ्लूचा पारनेरात आणखी एक बळी

0

पारनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील वडगाव सावताळ येथील 48 वर्षीय सिंधूबाई रावसाहेब खरमाळे यांचा शनिवार (दि.20) रोजी सकाळी 7 वाजता स्वाईन फ्यूने मृत्यू झाला. दि. 19 रोजी वासुंदे येथील पंढरीनाथ रामकिसन झावरे (वय 35) यांचा मृत्यू झाला होता. तर आज खरमाळे यांचा मृत्यू झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

तालुक्यातील वडगाव सावताळ येथील सिंधूबाई रावसाहेब खरमाळे यांना अस्वस्थ वाटल्याने दि. 16 मे रोजी टाकळी ढोकेश्वर येथे उपचारार्थ दाखल केले. त्यानंतर अहमदनगर येथील खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान त्यांच्या रक्ताची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये त्यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना तातडीने पुण्यातील रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच आज शनिवारी सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान मृत्यू झाला.
पारनेर तालुक्यात स्वाईन फ्लूचा सगल दुसरा बळी गेल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झालेले आहे. आरोग्य विभागाने याची गंभीर दखल घेऊन या परिसरातील ग्रामस्थांची तपासणी मोहिम हाती घ्यावी, अशी मागणी होत आहे.


टाकळी ढोकेश्वर गटाला आजाराची लागण
तालुक्यातील टाकळी ढोकेळ्वर जिल्हा परिषदेच्या गटातील टाकळी ढोकेश्वर गटातील वासुंदे, वडगाव सावताळ, पळसपूर, मांडवे आदी परिसरातील स्वाईन फ्यू सदृश्य आजाराने थैमान घातले आहे. परंतु आरोग्य विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांमधून आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.


प्रतिबंधात्मक उपाय योजना करणार
पारनेर तालुक्यातील वासुंदा येथील पंढरीनाथ किसन झावरे व वडगाव सावताळ येथील सिंधूबाई रावसाहेब खरमाळे यांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झालेला आहे. झावरे यांच्या कुटुंबातील 15 तर वडगाव खरमाळे यांच्या कुटुंबातील 10 सदस्यांची तपासणी करण्यात आली असून प्राथमिक उपचार म्हणून टॅमी फ्लूच्या गोळ्या वितरीत करण्यात आलेल्या आहेत. या बरोबर वासुंदे व वडगाव सावताळ परिसरात तपासणी मोहिम हाती घेऊन प्रतिबंधात्मक उपाय योजना करणार आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी एस. ए जाधव यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

*