स्वाइन फ्लूने महिलेचा मृत्यू

0
खडकेवाके (वार्ताहर)- राहाता तालुक्यातील खडकेवाके येथे अनिता सुभाष कौसे (वय 30) या महिलेचा स्वाइन फ्लूसदृश्य आजाराने मृत्यू झाला.यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
अनिता हिस सुरवातीला सर्दी खोकला व ताप या आजाराने ग्रासले होते. खाजगी दवाखाना करूनही काही फरक पडत नसल्याने त्यांना शिर्डी येथे साईबाबा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
तिथून त्याना नाशिकला जाण्याचा सल्ला देण्यात आला. नाशिक येथे सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले.
परंतु तेथेही त्याना कुठलाच फरक पडला नाही.नाशिक येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यांच्या पश्‍चात पती, एक मुलगा, एक मुलगी, सासू सासरे असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

*