भाजप आमदारांचा मराठा क्रांती मोर्चाला पाठींबा

0

मुंबई | मराठा आरक्षण मागणीवरून विधानसभेत सर्व पक्षीय आमदार आक्रमक घोषणा व गदारोळात कामकाज वारंवार तहकूब झाले होते.

मराठा मूकमोर्चाला भाजप आमदारांसह सर्वपक्षीय आमदारांनी पाठींबा दिला आहे. मुंबई येथे मराठा क्रांती मोर्चामध्ये ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, शेवगाव- पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे, संगीता ठोंबरे, आ.स्नेहलता कोल्हे, आ.सिमा हिरे यांच्यासह अनेक आमदारांनी मराठा क्रांती मोर्चाला पाठींबा दिला आहे.

भाजपने अनेक दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण का दिले नाही. जर मुंबईच्या एल्गार मोर्चानंतर हा मुद्दा असाच राहिला तर मराठा समाजाकडून मराठा आमदारांचे राजीनामे देण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.

भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार याठिकाणी आले होते त्यांना धक्काबुक्की झाल्याची चर्चा आहे. मात्र शेलारांनी आरोप फेटाळले आहेत.

LEAVE A REPLY

*