‘उन्हाचा तडाखा अन् लग्नांचा ‘धुमधडाका’

0
जळगाव | प्रतिनिधी :  शहराच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. वाढत्या उन्हाच्या तडाखात्यात लग्नाचा धुमधडाका सुरु असल्याने लग्न मिरवणुकीत वर्‍हाडी मंडळी बॅन्ड बाजाच्या तालावर बेधुंद होवून ठेका धरतांना दिसून येत आहे.

वाढत्या उन्हाच्या असाह्य उकाडयामुळे जळगावकरांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. तापमानाच्या पाराची पंचेचाळीशीकडे वाटचाल सुरु असल्याने शहरवासिंयांना वाढत्या उन्हाचा चांगलाच फटका बसत आहे.

लग्नसराईचा सर्वत्र धुमधडाका सुरु असून बाजारापेठेत दुपारी देखील नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. तर दुसरीकडे वाढत्या उन्हाची तमा न बाळगता तरुणाई झिंगाट, मेरे यार की शादी है, ऑखे तो खोलो स्वामी, यासह हिंदी मराठी गीतांवर वर्‍हाडीमंडळी भर उन्हात धुम करीत असून तरुणाईच्या उत्साह तसूभर देखील कमी झालेला दिसत नाही. याउलट झाडाच्या सावली ठिकाणी वर्‍हाडीमंडळींचा जल्लोष अधिकच दिसून येत आहे.

वर्‍हाडी मंडळी घामघूम

पुर्वीपासूनच जळगाव शहराला हॉट सिटी म्हणून ओळखले जाते. यंदा शहराच्या तापमानाने मार्च महिन्यातच चाळीशी पार केली आहे. परंतू सर्वत्र लग्नसराईचा धुमधडका सुरु आहे. मात्र असह्य उकाड्यामुळे वर्‍हाडी मंडळी चांगलीच घामाघुम होतांना दिसून येत आहे.

भर उन्हात बँन्डच्या  तालावर धरताहेत ठेका

वाढत्या तापमानामुळे प्रचंड उकाळा होत असून दुपारच्या सुमारास पडणारे ऊन देखील असह्य होवू लागले आहे. मात्र दुपारच्या सुमारास पडणार्‍या उन्हात देखील वर्‍हाडींकडून डि.जे., बँन्डच्या तालावर ठेका धरतांना दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

*