‛तू माझा सांगाती’ मालिकेत सिन्नरचे सुधीर गुजराथी

0
सिन्नर (सुनील जाधव)| कलर्स मराठीवर सुरु असलेल्या ‛तू माझा सांगाती’ या तुकोबांवर आधारित मराठी मालिकेत सिन्नर येथील सुधीर गुजराथी हे झळकणार आहेत.

या मालिकेत त्यांनी रियाज मियाँ या नावाने सारंगी वादकाची भूमिका साकारली आहे. येत्या मंगळवारी (दि.18) सायंकाळी 7.30 वाजता कलर्स मराठीवर सुरु असणाऱ्या ह्या मालिकेच्या भागात गुजराथी यांची भूमिका बघायला मिळणार आहे.

वर्षा तांदळे, स्मिता सरोदे, रोहन पवार, शीतल चिपडे, महेश सुभेदार, विशाल कुलथे या कलाकाराबरोबर गुजराथी यांनी काम केले आहे.

जो पर्यंत कान्होपात्रा यांचे पात्र आहे तोपर्यंत गुजराथी यांना काम करण्याची संधी याठिकाणी मिळाली आहे. गुजराथी यांनी मराठी, हिंदी चित्रपट- मालिकांमध्ये काम केले असून या मालिकेत त्यांना जास्त दिवस काम करण्याची संधी मिळाली आहे.

रुची फिल्मस् निर्मित या मालिकेचे संगीत कुलकर्णी हे दिग्दर्शन करत असून त्यांना अमित सावर्डेकर सहाय्य करत आहे. सप्रेम कुलकर्णी व समिर शिंदे निर्मिती सहाय्यक म्हणून काम पहात आहे.

LEAVE A REPLY

*