त्र्यंबकेश्वरला शेतकर्‍यांचा रास्ता रोको

0
वेळूंजे-त्र्यंबकेश्वर: 
कर्जमाफीसह इतर मागण्यासाठी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेतकरी एक जूनपासून संपावर जात असून शासनाला इशारा देण्यासाठी तालुक्यातील सर्व शेतकरी तसेच सर्व पक्षीय नेते, कार्यकर्ते तूप देवी येथे दुपारी अकरा वाजता रास्ता रोको केला.
यावेळी शेतकर्यांनी बैठकीत संपावर जाण्यासाठी एकमुखी शपथ घेतली. कधी ओला दुष्काळ, तर कधी कोरडा दुष्काळ पडतो.

शेतमाल पिकतच नाही.खुप कष्ट करूनही शेतकर्याच्या मालाला भाव नसतो.भाव पडण्यासाठी सरकार शेतमालाची आयात करते. काही शेती पिकावर निर्यात बंदी लावल्याने परिणामी भाव मिळत नाही.

अनेक आंदोलने झाली पण सरकारला जाग येत नाही.त्यामुळे संपावर जाण्याचा निर्णय घेत असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष नवनाथ कोठुळे यांनी सांगितले.

यावेळी तालुक्यातील विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, व्हा. चेअरमन यांच्यासह तालुक्यातील सर्वच नेत्यांनी किसान क्रांतीचा संप यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

रास्ता रोको केल्यानंतर मागण्यांचे निवेदन त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनला देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी अध्यक्ष पुरुषोत्तम कडलग ,शिवसेना संपर्क प्रमुख भूषण अडसरे, समाधान बोडके , रामनाथ बोडके , शिवाजी कसबे ,शेतकरी नेते ज्ञानेश्वर सोनावणे, ग्राहक सेना अध्यक्ष शिवाजी कसबे,संतोष मिंदे,रावसाहेब कोठूळे, शांताराम पोरजे, श्रीराम कोठुळे,भाऊसाहेब कोठुळे आदींसह तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रामाणात उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*