धावत्या बसमध्ये हृदयविकाराचा धक्का; प्रवाश्याचा मृत्यू

0
नाशिक | धावत्या बसमध्ये हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्याने प्रवाश्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज बागलाण तालुक्यात घडली.

पिंपळगाव आगाराची बस विंचूर प्रकाशा मार्गावर नाशिकहून नंदुरबारकडे निघाली होती. सटाणा येथील बस स्थानकात थांबा घेउन दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास वीरगावनजीक पोहोचली होती.

धुळे जिल्ह्यातील आणि साक्री तालुक्यातील बल्हाने येथील प्रवाशी चिमण पाटील या बसमधून प्रवास करत होते. त्यांना अचानक छातीत दुखू लागल्यामुळे बसचालकाने प्रसंगावधान राखत ताहाराबाद येथील रुग्णालयात बस नेली. मात्र येथील    डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.

चिमण पाटील यांच्या खिशातील आधार कार्ड आणि मोबाईलच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबाशी संपर्क साधण्यात आला असून घटनेची माहिती त्यांना देण्यात आली.

LEAVE A REPLY

*