कृषी विषयी चुकीच्या धोरणामुळे शेतकरी उद्ध्वस्त ः ना. विखे

0

पिंपरी निर्मळ (वार्ताहर)- राज्य सरकारच्या चुकीच्या कृषी धोरणामुळे शेतकर्‍यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होऊनही त्यांना भरपाई पासून वंचित राहावे लागत असून या धोरणात बदल करण्याची आवश्यकता असल्याचे मत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पिंपरी निर्मळ येथे नुकसान पाहणी दौर्‍याच्या वेळेस व्यक्त केले.

पिंपरी निर्मळ परिसरात वादळामुळे डाळिंब फळबागांचे तसेच पॉली हाऊसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याची पहाणी करण्यासाठी ते आले होते. यावेळी राहाता पंचायत समितीचे उपसभापती बबलू म्हस्के, गणेशचे संचालक जालिंदर निर्मळ, सूर्यकांत निर्मळ, विभागीय कृषी अधिकारी श्री. मुसमाडे, तहसीलदार माणिक आहेर, मंडल कृषी अधिकारी अशोक घोरपडे, सरपंच सौ. शालिनी निर्मळ, सेवा सोसायटीचे अध्यक्ष नामदेव निर्मळ आदींसह उपस्थित होते.

वादळामुळे तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान 33 टक्केच्या पुढे असलेतरच शेतकर्‍यांना मदत मिळते. मात्र त्यामुळे शेतकर्‍यांवर अन्याय होत आहे. तसेच कर्ज घेऊन उभे केलेले पॉली हाऊसचेही या वादळात नुकसान झाले आहे. मात्र शासनाकडून त्यासाठी मदतीची कोणतीही तरतूद नसल्यामुळे शेतकर्‍यांवर अन्याय होत असल्याचे ना. विखे म्हणाले. त्यामुळे या धोरणात बदल करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. कैलास निर्मळ व गणेश निर्मळ यांच्या पॉली हाऊसची पाहणी ना. विखे पाटील यांनी केली. गावातील चार दिवसांपासून विस्कळीत असलेला वीजपुरवठा सुरळीत करण्याचा तसेच गावात ज्याठिकाणी नळपाणी पुरवठा होत नाही त्या वाड्यावस्त्यांवर ग्रामपंचायतीने तातडीने टँकर सुरू करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य अशोक घोरपडे, सेवा सोसायटीचे संचालक भाऊसाहेब घोरपडे, डॉ. विकास निर्मळ, कैलास घोरपडे, अर्जुन इल्हे, फक्कडराव घोरपडे, कैलास निर्मळ, ज्ञानदेव घोरपडे, संदीप निर्मळ, विष्णू घोरपडे, जालिंदर निर्मळ, नारायण घोरपडे, निखिल निर्मळ, गोपीनाथ निर्मळ, शिवाजी निर्मळ, ग्रामविकास अधिकारी शिदे, कामगार तलाठी गायकवाड, कृषी सहाय्यक श्रीमती लाटे आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

कर्जमाफी तसेच हमीभाव हाच पर्याय
राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. काँग्रेस व मित्र पक्षाची सरकारला जाग आणण्यासाठी राज्यभर संघर्ष यात्रा सुरू आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी तसेच शेतकर्‍याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सरकाने तातडीने संपूर्ण कर्जमाफी करून उत्पादन खर्चावर आधारीत हमी भाव देण्याचे धोरण स्वीकारण्याची गरज असल्याचे मत यावेळी ना. विखे पाटील यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

*