…आणि म्हणून तुंबले नाशिक; देशदूत डिजिटलवर नाशिककरांनी सांगितली कारणे आणि उपायही

0
नाशिक । बुधवारी नाशिक शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी तुंबले, वाहतुकीचा खोळंबा झाला. यासंदर्भात ‘देशदूत डिजिटल’वर नाशिककर वाचकांची मते मागविली त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

अनेकांनी रस्त्यांची कामे सदोष असल्याचे, अभियंते आणि अधिकारी गटारीच्या टेंडरमध्ये फक्त टक्केवारीवर लक्ष ठेवतात, प्रत्यक्षात काम चांगले होते की नाही हे पाहत नाही अशाही संतप्त प्रतिक्रिया दिल्या.

रस्त्यावरील सांडपाण्याचे चेंबर्स डांबर किंवा सिमेंटने बुजविण्यात आले आहे. त्यामुळे त्यातून पावसाचे पाणी वाहून जात नाही. त्याची स्वच्छता व्हायला हवी. नागरिकांनीही प्लॅस्टिक, कचरा इत्यादी गोष्टी नदीनाल्यात, गटारीत टाकायला नको अशा उपायोजनाही सुचविण्यात आल्या.

फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप, वेबसाईटवर आलेल्या काही

निवडक प्रतिक्रिया :

गटारीच्या टेंडरमध्ये इंजिनिअर मंडळीचा केवळ टक्केवारीवर डोळा काम मात्र रामभरोसे
– किर्ती जैन

रस्ते बनवायेच कॉन्ट्रॅक्ट देता, पण ड्रेनेजच्या पाईपलाईनला कुठे जोडले नाही. मागच्या वर्षीही रस्ते तुंबले होते. गंगापूर रोडवर दुभाजक केले, पाण्याचा उतार कुठे ठेवायचा याचा अभ्यास केला का? हे कॉन्ट्रॅक्टर कोण ठरवितो. कोट्यवधीचे कंत्राटे दिली जातात, पण कामात अभियांत्रिकीचा भाग कमीच असतो. मी चॅलेंज देऊन सांगतो की कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला स्टॉर्म वॉटर ड्रेनेज पाईप लाईन कुठे आहे हेही माहीत नसेल.
– मुकुंद डहाळे

पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी ड्रेनेजची क्षमता अपुरी आहे. तसेच देखभालीचे कामही अगदीच हलक्या प्रतीचे असते.    – नरेंद्र सोनार

हे तर होणारच होते, येऊ द्या अजून अच्छे दिन – गुड्डू सय्यद

नाले-गटारे वेळीच साफ न केल्याने, पाण्याचा निचरा न झाल्याने, मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा हेही नाले तुंबण्याचे कारण आहे. तसेच नाले सफाई ही वेळेत झालेली नाही. – डॉ संदीप भानोसे

मागील वर्षीचा अभ्यास थोडा कमी पडला – प्रसाद देशमुख

नैसर्गिक ओढे -नाले बुजवून त्यावर बांधकाम केले गेले. तसेच रस्त्यांची उंची नवीन डांबरीकरणामुळे वाढली               – जतीन पवार

महानगर पालिका अधिकार्‍यांची काम करण्याची मानसिकता गटारीसारखीच तुंबली आहेत. त्यामुळे साहजिकच नाशिक तुंबले.

नाशिक का तुंबले? तर कमळ उगवायचे होते…

LEAVE A REPLY

*