सर्वांच्या आवडत्या एसटीचे नव्या रुपात परिवर्तन

0

देशदूत डिजिटल विशेष

नाशिक, दि. १२ : प्रवासासाठी प्रथम पसंती असलेल्या एसटी बसचे आता नव्या रुपात परिवर्तन होणार असून लवकरच नव्या दणकट बांधणीच्या आणि मोकळ्या ढाकळ्या बस प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार आहे.

एस.टी. महामंडळाच्या जनसंपर्क विभागाने ही माहिती कळविली आहे. या पूर्वी एस.टी. बस या ॲल्युमिनियमच्या बनविण्यात येत होत्या.

परिणामी अपघातात त्यांचे नुकसान होऊन प्रवाशांची सुरक्षा धोक्यात येत असे. मात्र नवी बस दणकट स्टिल बांधणीची असणार आहे.

दापोडी येथील एसटीच्या केंद्रीय कार्यशाळेत तयार झालेली एक बस प्रायोगिक तत्वावर पुढील काही दिवसात रस्त्यावर धावताना दिसेल.

या बसची उंची ३० सेंमीने वाढविण्यात आल्यामुळे पूर्वीपेक्षा प्रवाशांना सामान ठेवण्यासाठी जास्त जागा उपलब्ध होणार आहे.

तसेच नव्या बसच्या खिडक्या जुन्या बसच्या तुलनेत आकाराने मोठ्या ठेवण्यात आल्या आहेत.  बस बांधणी करताना दोन सांध्यांमध्ये थर्मोकोलचा वापर करण्यात आला असल्याने गाडीचा आवाज होणार नाही.

गाडीचे फलक एलईडी स्क्रीनमध्ये असून प्रवाशांना सुचना देण्यासाठी चालकाजवळ स्वतंत्र माईक असेल. तसेच आपात्कालिन प्रसंगी प्रवाशांना सतर्क करण्यासाठी बसमध्ये अलार्मची सोय आहे.

गाडीमध्ये हवा खेळती ठेवण्यासाठी छताला तीन ठिकाणी रुफ हॅच बसविण्यात आले आहे. बस धावताना हवेचा रोध कमी होण्यासाठी तिचा आकार ‘एअरोडायनॅमिक’ करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*