वनोलीजवळ बस-दुचाकीचा अपघात; एक ठार

0
नाशिक | विंचूर प्रकाशा महामार्गावरील सटाणा-ताहाराबाद रस्त्यावर वनोलीनजीक राज्य परिवहन महामंडळ बस आणि दुचाकीचा अपघात झाला. यात भंडारपाडा येथील शंकर धर्मा वानखेडे (वय ३२) यांचा उपचारासाठी घेऊन जात असतांना मृत्यू झाला. याप्रकरणी सटाणा पोलीस स्टेशनमध्ये बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुपारी अडीच वाजेच्या सुमारास नंदुरबारहुन निघालेली बस क्रमांक एमएच ११ बीएल ९२७५ नाशिककडे जात असतांना वनोलीनजीक बसने पुढे चालत असलेली दुचाकी क्रमांक एमएच ४१ एएन ३११२ ला मागून धडक दिली.

या धडकेत भंडारपाडे येथील शंकर वानखेडे यांना जबर दुखापत झाली. यात त्यांच्या शरीरातून रक्तस्राव मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे त्यांना मालेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असतांना  ब्राह्मणगावजवळ त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, बसचालकावर सटाणा येथील पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून बस ताब्यात घेण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*