आनंद दिघे इंग्लिश स्कूल : 100 टक्के निकाल

0
वीरगाव (वार्ताहर) – अकोले तालुक्यातील वीरगाव येथील धर्मवीर आनंद दिघे इंग्लिश मीडियम स्कूलने आपल्या 100 टक्के निकालाची परंपरा यावर्षीही कायम ठेवली. इयत्ता 10 वी परीक्षेत शाळेचे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण 58 विद्यार्थ्यांपैकी पांडुरंग सावळेराम बेणके ह्यास 87.60 गुणांद्वारे प्रथम क्रमांक मिळाला. साक्षी सुभाष नेहे (84.20टक्के), सागर रामनाथ घोडसरे (82.20टक्के), दत्तात्रय लालू पोरे (80टक्के),  योगेश भास्कर भोजणे(73.40टक्के) अशी अनुक्रमे द्वितीय, तृतीय, चौथा आणि पाचव्या क्रमांकाचा गुणानुक्रम आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, सचिव अनिल रहाणे, प्राचार्य किरण चौधरी, कॅम्पस डायरेक्टर लक्ष्मण ढोन्नर, लक्ष्मण कवडे, भीमराज मंडलिक, रविंद्र आंबरे, पिंगला सोनवणे, सुधीर उगले, स्नेहा बिबवे, नीलिमा सुर्वे, दत्तात्रय जगताप, मंजुश्री आहेर, अलका आहेर, निलेश भागडे, उषा गुंजाळ, अंजिरा देशमुख या शिक्षकांनी कौतुक केले.

LEAVE A REPLY

*