राहुरी तालुक्यातील शाळांचा दहावीचा निकाल

0

14

देवळाली प्रवरा (वार्ताहर)- येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल 86.70 टक्के लागला आहे. पल्लवी कचरू खंडागळे या विद्यार्थिनीने 94 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर अक्षय रामचंद्र मुसमाडे 90.20 टक्के गुण मिळवून द्वितीय व आर्यन नवनाथ खंडागळे 89.20 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे. यावर्षीही विद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे.
इयत्ता दहावीसाठी विद्यालयातून 280 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. पैकी 241 विद्यार्थी उतीर्ण झाले. 80 विद्यार्थी प्रथम श्रेणी, 87 विद्यार्थी द्वितीय श्रेणी, 22 विद्यार्थी तृतीय श्रेणीत व 52 विद्यार्थी विशेष प्राविण्य मिळवून उतीर्ण झाले असल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य एल. डी. क्षीरसागर यांनी दिली.
गुणवंत विद्यार्थ्यांचे शिर्डी संस्थानचे उपाध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर कदम, नगराध्यक्ष सत्यजित कदम, पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष शहाजी कदम, चैतन्य मिल्क उद्योग समुहाचे वतीने गणेशराव भांड यांनी अभिनंदन केले.

बारागाव नांदूर (वार्ताहर)- येथील संत तुकाराम विद्यालयाचा दहावीचा निकाल 85.93 टक्के लागला आहे. त्यात समीर बाळासाहेब आघाव यास 95.40 टक्के गुण मिळवून शाळेत पहिला आला आहे. दहावीच्या परीक्षेत एकूण 64 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 55 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
गेल्या चार वर्षापासून या विद्यालयाचा दहावीचा निकाल समाधानकारक लागत असल्याने पालकांनी व शिक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे. विद्यालयाच्या चांगल्या निकालाची परंपरा मुख्याध्यापक मंडलिक, पर्यवेक्षक पठाण, तोंडे, तनपुरे, पोटे, मोरे, कासार, आंबेकर, बोरकर, कोरडे, आदींच्या परिश्रमामुळे याहीवर्षी राखली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

राहुरी फॅक्टरी (वार्ताहर) – देवळाली प्रवरा येथील राहुरी रुरल विमेन्स इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन या संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलचा एस.एस.सी.चा निकाल 100 टक्के लागला असून गेली सलग 14 वर्ष 100 टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.
विद्यालयातील स्वप्निल विठ्ठल चव्हाण (92.80 टक्के) प्रथम, श्‍वेता प्रमोद कदम (91.80 टक्के) द्वितीय, यश पोपटलाल भंडारी (89.8 टक्के) तृतीय तर नयन राजेंद्र भाग्यवान याने 89 टक्के गुण मिळवून चौथा क्रमांक पटकविला आहे. स्वप्निल चव्हाण यास गणित व सायन्स या विषयात अनुक्रमे 98 व 95, श्‍वेता कदम हिला अनुक्रमे 98 व 95, यश भंडारी याने अनुक्रमे 98 व 93 तर नयन भाग्यवान यास 93 व 97 गुण मिळाले आहेत.
विद्यालयाची उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवणार्‍या विद्यार्थ्यांचा गौरव करून संस्थेच्या अध्यक्षा डॉ. गीता राऊत, सचिव प्रा. सतीश राऊत, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, संचालक मच्छिंद्र तांबे, सुधाकर कराळे, नानासाहेब कदम, रफीकभाई शेख, गणेश विघे, प्राचार्य डी. एस. भोसले व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

सात्रळ (वार्ताहर) – रयत शिक्षण संस्थेच्या नानासाहेब सहादू कडू पाटील विद्यालय, सात्रळ येथील एस.एस.सी. परीक्षेचा निकाल घोषित झाला आहे. यशस्वी निकालाची उज्ज्वल परंपरा कायम ठेवण्यात विद्यालयास यश प्राप्त झाले आहे.
विद्यालयाच्या गरुकुल व सेमी विभागाचा 100 टक्के तर विद्यालयाचा 92.22 टक्के निकाल लागला आहे. या निकालाचे वैशिष्टे म्हणजे 46 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले तर 69 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
निखिल अजित रेपाळे, प्रथम 96.80 टक्के, अथर्व सर्जेराव शिंदे, द्वितीय, 95.60 टक्के, योगेश ज्ञानदेव कुमकर, तृतीय, 94.40 टक्के गुण मिळविले. यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे प्राचार्य एल. बी. आसावा, पर्यवेक्षक जी. बी. देसाई व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू, विभागीय अधिकारी बी. वाय. शिरसाठ, उपविभागीय अधिकारी एस. पी. ठुबे, प्राचार्य एल. बी. आसावा, मुख्याध्यापिका सोनार, पर्यवेक्षक जी. बी. देसाई, विजयराव कडू, बबनराव कडू, जनार्दन दिघे, संभाजीराव चोरमुंगे, भास्करराव फणसे, उपसरपंच गणेश कडू, किरण कडू, पंकज कडू, शांतीभाऊ गांधी, नानासाहेब दिघे, रयत सेवक संघाचे सरचिटणीस भाऊसाहेब पेटकर, सर्व शिक्षक व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

*