उद्या दुपारी दहावीचा निकाल

0
नाशिक : अनेक दिवसांपासून पालक आणि विद्यार्थी दहावीच्या निकालाच्या प्रतीक्षेत होते.  अखेर आज राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या निकालाचे परिपत्रक काढण्यात आले असून त्यानुसार उद्या दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल विद्यार्थ्यांना बघता येणार आहे. त्याआधी शिक्षण मंडळाची सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषद होणार आहे.

दहावी परीक्षेसाठी राज्यातील सुमारे 17 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे.  अनेक दिवसांपासून सोशल मीडियात दहावीच्या निकालाबाबत तर्कवितर्कांना उधान आले होते.

अखेर राज्य मंडळाकडून निकालाच्या तारखेची अधिकृत घोषणा करण्यात आल्याने या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत यंदा आठवडाभर उशिराने निकाल जाहीर होतो आहे.

याठिकाणी बघता येईल दहावीचा निकाल

 

1. www.mahresult.nic.in

2. www.result.mkcl.org

3. www.maharashtraeducation.com

४.

LEAVE A REPLY

*