कवाद सेवाभावी संस्थेच्या न्यू इंग्लिश मीडियम स्कूलचा 100 टक्के निकाल

0
निघोज (वार्ताहर) – पारनेर तालुक्यातील निघोज येथील बाबासाहेब कवाद सेवाभावी संस्थेच्या न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या सन 2016-17 दहावी बॅचचा निकाल 100 टक्के लागला असून प्रथम क्रमांक भावना धोंडीभाऊ गावडे (95.60 टक्के), द्वितीय क्रमांक आरती पांडुरंग माने (95.20 टक्के), तृतीय क्रमांक कोमल बाळु कारखिले (94 टक्के) यांनी मिळविला. एकूण 24 विद्यार्थी या परीक्षेस बसले होते. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मॅनेजर आर. डी गायकवाड, मुख्याध्यापक एस. ए. डायस, वर्गशिक्षिका खोडदे, श्रीमती मोरे, घावटे, थोरात, शिरसाठ, भोर, उचाळे व श्री. बेलोटे यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक बाबासाहेब कवाद, सेवा सोसायटीचे अध्यक्ष शांताराम कळसकर व सर्व विश्वस्तांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

*