मारुतीराव कोते अभिनव पब्लिक स्कूलचा निकाल 100 टक्के

0

अकोले (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2017 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला त्यात अभिनव शिक्षण संस्थेच्या मारुतीराव कोते अभिनव पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. मागील 16 वर्षांच्या निकालाची परंपरा कायम ठेवत यावर्षी देखील विद्यालयाचा चा एकूण निकाल 100 टक्के लागला.
कु. आशिती प्रल्हाद जाधव या विद्यार्थिनीने 96.20टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकविला तर कु. प्रेरणा शिवाजी केकाण व कु. श्रुती गजानन नाईकवाडी यांनी 93 टक्के गुण मिळवून द्वितीय तर अथर्व प्रवीण मुंदडा या विद्यार्थ्याने 92.60 % गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला.

या निकालाचे विशेष महत्व म्हणजे एकूण 45 विद्यार्थी डिस्टीक्शन मध्ये उत्तीर्ण झालेले आहेत. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव नवले, उपाध्यक्ष सुरेशराव कोते, सचिव माजी प्राचार्य रमेशचंद्र खांडगे, सह सचिव रामकृष्ण नवले, खजिनदार भाऊसाहेब नाईकवाडी, सदस्य ल. का. नवले, सौ रंजनाताई नाईकवाडी, विक्रम नवले,

प्रा. भक्ती कोते, कॅम्पस डायरेक्टर प्रा. जयश्री देशमुख, मारुतीराव कोते अभिनव पब्लिक स्कूलच्या प्राचार्या अल्फोन्सा डी प्राचार्या अपर्णा श्रीवास्तव ज्युनिअर कॉलेजचे विभाग प्रमुख प्रा. पांडुरंग गुंजाळ, प्राचार्य लक्ष्मीकांत आहेर एमबीए चे संचालक डॉ.कुंभार, प्रा. किरण गोंटे प्रा. अनिल बेंद्रे, डीएड चे प्राचार्य सोपानराव जाधव, बीएड चे प्राचार्य भाऊसाहेब आंधळे संस्थेचे प्रशासन अधिकारी दिलीपकुमार मंडलिक आदींनी अभिनंदन केले.

 

LEAVE A REPLY

*