SRT स्मार्टफोनचे सचिनच्या हस्ते लाँचिंग!

0

सचिन तेंडुलकर आणि स्मार्टोन कंपनीनं मिळून srt हा नवा स्मार्टफोन लाँच केला आहे.

भारतीय स्टार्टअप कंपनी loT ने या स्मार्टफोनच्या माध्यमातून सचिन तेंडुलकरला एक अनोखी मानवंदना दिली आहे. सचिन या स्मार्टफोनचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आहे.

srt स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट लाँच करण्यात आले आहेत.

हा स्मार्टफोन आजपासून (गुरुवार) फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. याच्या 32 जीबी व्हेरिएंटची किंमत 12,999 रु. आहे. तर 64 जीबी व्हेरिएंटची किंमत 13,999 रुपये आहे.

srt स्मार्टफोनचे खास फीचर:

या स्मार्टफोनमध्ये ड्यूल सिम असणार आहे.

अँड्रॉईड 7.0 नगेटवर हा स्मार्टफोन आधारित असणार आहे.

यामध्ये 5.5 इंच स्क्रिन असून याचं रेझ्युलेशन 1080×1920 पिक्सल आहे.

या स्मार्टफोनमध्ये 1.8GHz ऑक्टा कोअर स्नॅपड्रॅगन 652 SoC प्रोसेसर आहे. तर 4 जीबी रॅम आहे.

यात 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे.

यामध्ये रिअर पॅनलवर फिंगर सेंसरही देण्यात आला आहे.

या स्मार्टफोनची बॅटरी 3000 mAh आहे.

LEAVE A REPLY

*