PHOTOS : बॅडमिंटनपटू श्रीकांत किदम्बी ‘आयटीएम’चा ब्रॅंड ऍम्बेसेडर

0

बॅडमिंटनमध्ये आपली दमदार कामगिरी दाखवणारा श्रीकांत किदम्बी खारघरच्या आयटीएम इन्स्टिट्युटचा ब्रॅंड ऍम्बेसेडर म्हणून ओळखला जाणार आहे.

हैदराबादमध्ये हा कार्यक्रम पार पडला. नागपूरमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत 4 सुपर सिरिज स्पर्धांची विजेतेपदं किदम्बीने पटकावली आहेत.

विद्यार्थ्यांनी क्रिडा क्षेत्रात आपल्या आडत्या खेळांमध्ये करिअर करावे हा मुख्य उद्देश आयटीएमचा आहे. यामागचे कारण म्हणजे आयटीएम लवकरच एक स्पोर्ट्स अकादमी सुरू करणार आहे. तेव्हा किदम्बी सारख्या उमद्या खेळाडूचा आदर्श विद्यार्थ्यांसमोर ठेवायचा असल्याचे यावेळी आयटीएमचे संस्थापक डॉ. पी.व्ही. रमन्ना यांनी आवर्जून सांगितले.

विशेष म्हणजे बॅडमिंटनमधील रायझिंग स्टार एच. एस. प्रणॉय आयटीएमशी संलग्न झाला आहे. यावेळी किदम्बीने त्याच्या करिअरमधील रिओ ऑलिम्पिक्सची त्याच्या पराभवाची आठवणही शेअर केली.आयटीएम सुरू करत असलेल्या स्पोर्ट्स अकादमीमध्ये जे खेळाडू प्रशिक्षण घेतीलत्यांना करिअर घडवण्यामध्ये मार्गदर्शन करणे ही माझ्यासाठी खुप मोठी गोष्ट असेल असे एच. एस. प्रणॉय याने म्हटले आहे.

 या कार्यक्रमावेळी बॅडमिंटन गुरू पुलेला गोपीचंद, श्रीकांत किदम्बी, एच. एस. प्रणॉय, डॉ. पी. व्ही. रमन्ना यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*