हिरे महाविद्यालयाच्या सिद्धार्थची ‘सुवर्णभरारी’

0
नाशिक : लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयाचा खेळाडू सिद्धार्थ बजरंग परदेशीने उझबेकिस्तान येथे सुरु असलेल्या एशियन एज ग्रुप डायव्हिंग स्पर्धेत तीन सुर्वणपदक मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली.

डायव्हिंग या क्रीडा प्रकारात ३ मी. स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग, ३ मी. सिंक्रोनाइझ स्प्रिंगबोर्ड (संघ) आणि १० मी. सिंक्रोनाइझ्ड प्लॅटफॉर्म प्रकारात सुवर्णपदक प्राप्त केली. डायव्हिंग या क्रीडा प्रकारामध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करीत संघास तीनसुर्वणपदक मिळवून दिली.

या अगोदर देखील सिद्धार्थने अनेक स्पर्धांमध्ये भारतीय संघास अनेक सुर्वणपदके मिळवुन दिली आहेत. ऑक्टोबर २०१६ मधे श्रीलंका येथे झालेल्या साउथ एशीयन स्पर्धेत एक सुवर्ण व दोन रौप्य पदके तर जपान येथे नोव्हेंबर २०१६ मधे झालेल्या एशियन चॅम्पियनशीपमध्ये सहावे स्थान प्राप्त केले होते.

डायव्हिंग क्रीडा प्रकारमध्ये आखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करतांना तीन सुवर्णपदके २०१६ मध्ये मिळविली होती. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने क्रीडाक्षेत्रातील ‘पै.खाशाबा जाधव’ सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता.

आंतर-राष्ट्रीय स्पर्धेत (डायव्हिंग) या क्रीडा प्रकारत भारताचे प्रतिनिधित्व करणारा सिद्धार्थ बजरंग परदेशी हा नाशिक जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राचे भूषण आहे. त्याच्या या उतुंग यशाबद्दल तसेच पुढील कालावधीत होणाऱ्या जागतिक जलतरण स्पर्धेसाठी व २०२० मध्ये होणाऱ्या ऑलोमपिक स्पर्धेत असेच यश मिळविण्यासाठी महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे सचिव मा. डॉ. प्रशांत हिरे, संस्थेचे समन्वयक व मा. शिक्षक आ. डाँ अपूर्व हिरे, युवा नेते मा. अद्वय हिरे, प्राचार्य डाँ. बापूसाहेब जगदाळे, उपप्राचार्य डॉ. रविंद्र देवरे, उपप्राचार्या डॉ. मृणाल भारद्वाज, विज्ञान शाखाप्रमुक डॉ. टी. आर. महाले.

कला व वाणिज्य शाखा प्रमुख डॉ. विनीत रकिबे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य पी. डी. झालसे, मार्गदर्शक मोगले, फारुख आणि सोनकांबळे,  क्रिडा संचालक डॉ. संतोष पवार, प्रा. रोशनी गुजराथी व प्रा.किशोर राजगुरू, जिमखाना मदतनीस राम कुमावत तसेच सर्व विभागप्रमुख शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी आभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

*