Wednesday, April 24, 2024
Homeनगरश्रीरामपूर पोलीस ठाण्यावर विनापरवाना मोर्चा

श्रीरामपूर पोलीस ठाण्यावर विनापरवाना मोर्चा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

येथील थत्ते मैदानावर झालेल्या सभेत प्रमुख वक्ते राजाभैय्या यांनी प्रक्षोभक चिथावणीखोर भाषण केल्याबद्दल त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी काल मुस्लीम समाज बांधवानी पोलीस स्टेशनवर विनापरवाना मोर्चा काढला होता. या मोर्चातील लोकांनी जिल्हाधिकार्‍यांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करत मोर्चा काढला म्हणून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात 38 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

- Advertisement -

शुक्रवार दि. 10 मार्च 2023 रोजी शहरातील थत्ते मैदानावर राजाभैय्या (राजसिंग) यांनी शिवजयंतीनिमित्त भाषण केले होते. या भाषणात मुस्लीम समाजाविषयी प्रक्षोभक व चिथावणीखोर भाषणे केल्याबद्दल त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी सोमवार दि. 13 मार्च रोजी दुपारी 12 वाजता श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यावर मुस्लीम समाजाचा मोठा जमाव पोलीस स्टेशनवर मोर्चाने आला.

या मोर्चाने आलेल्यांनी दि. 1 मार्च ते 14 मार्च या दरम्यान महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)चे प्रतिबंधक आदेश असताना कोणतीही परवानगी न घेता एकत्र जमून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला आणि अहमदनगर जिल्हा दंडाधिकारी अहमदनगर यांच्या आदेशाचा भंग केला.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिंसानी आदील मुखदुमी, शोएब जमादार, तौफीक शब्बीर शेख, मौलाना इर्शाद, मुजीब राजू शेख यांच्यासह 38 जणांविरुध्द भादंवि कलम 188 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1), 135 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस नाईक बैसाने करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या