श्रीरामपूर इनरव्हिल क्लबचे कार्य उल्लेखनिय ; झिने

0
श्रीरामपूर(प्रतिनिधी)- सेवा भाव असलेल्या इनरव्हिल क्लब श्रीरामपूरचे कार्य उल्लेखनीय आहे अशा क्लबच्या पदग्रहण समारंभास आपणास उपस्थित राहून मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली असे प्रतिपादन परिवहन खात्याच्या इन्सपेक्टर  जयश्रीताई झिने यांनी केले.
इनरव्हिल 3लब श्रीरामपूरच्या नुतन अध्यक्ष डॉ.सौ. ज्योत्सना तांबे व सेके्रटरी  ममता गुप्ता व त्यांच्या सहकार्‍यांच्या पदग्रहण समारंभप्रसंगी प्रमुख अतिथी असलेल्या  जयश्रीताई झिने बोलत होत्या.कार्यक्रमास माजी अध्यक्षा रमा फोपळे, माजी सेक्रेटरीवृंदा देशपांडे, सुरेखा दंड, प्राजक्ता बनकर, स्वाती ढालपे, मंगला आढाव, प्रिया शहा, डॉ. सिंधुताई पडघन, राखी बिहाणी, शितल भुतडा, डॉ. सुचिता भट्टड, वंदना मुरकुटे, उज्वला उंडे, प्रिया अग्रवाल, श्‍वेता शहा, डॉ. शितल घोगरे, सुवर्ण दळवी, रुपाली शहा, रत्नप्रभा देशमुख, सुनिता धुमाळा, पुनम गांधी, योगिता कोटक, शर्मिला पांडे, कल्पना बनकर, शैलेजा गिरमे, नंदिनी मुळे, नुतन सदस्या अरुणा टेकावडे, वैशाली देशमुख,
अनुराधा काळे, केतकी बनकर, स्वाती शहा, निता धुमाळ, वर्षा जोशी, उर्मिला मुळे, राजश्री बोठे यांनी शपथ घेतली. यावेळी रोटरी क्बचे माजी अध्यक्ष डॉ. विजय तांबे, इनरव्हिल क्लबच्या माजी अध्यक्षा प्रिया अग्रवाल, स्वाती धालपे, कल्पना बनकर, वृंदा देशपांडे आदींची भाषणे झाली. कार्यक्रमास रोटरी क्लबचे नुतन अध्यक्ष डॉ. सुरज थोरात, सचिव विनोद पाटणी, माणिकराव जगधने,
अविनाश आपटे, डॉ. दिलीप पडघन, गंगानाथ देशपांडे, छबुकाका गिरमे, सृष्टीपाल धुस्सा, ज्ञानेश्‍वर मुरकुटे, अनिल पांडे, विशाल फोपळे, दत्तात्रय धालपे, जितेंद्र अग्रवाल आदी उपस्थित होते. मावळत्या अध्यक्षा  रमा फोपळे यांनी गतवर्षात केलेल्या कामांचा आढावा घेतला. नुतन अध्यक्षा ज्योत्सना तांबे यांनी वर्षभरात विविध उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संगिता फासाटे यांनी केले. तर आभार सेके्रटरी सौ. ममता गुप्ता यांनी मानले.

LEAVE A REPLY

*