श्रीरापुरात गावठी कट्टा पकडला

0
श्रीरामपूर (प्रतिनिधी) – शहरातील वेस्टन चौकात एका तरुणास संशयितरित्या फिरत असल्याचे पाहून पोलिसांनी त्यास पाठलाग करुन पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्या कंबरेला एक गावठी कट्टा आढळून आला असून एक जिवंत काडतुसही आढळून आले. पोलिसांनी त्यास अटक केली असून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांना शहरातील वेस्टन चौकात एक तरुण कंबरेला कट्टा लावून फिरत आहे, अशी खबर्‍यामार्फत माहिती मिळाली. त्यानुसार जिल्हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस अधिक्षक रोहिदास पवार, पोलीस उपअधिक्षक सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी स्वतः पोलीस नाईक जोसेफ साळवी, पोलीस कॉन्स्टेबल विरप्पा करमल, पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी ढाकणे, सचिन गणगे, पोलीस कॉन्स्टेबल दीपक किल्लेदार यांना घेऊन ते वॉर्ड नं. 2, सुभेदार वस्ती, वेस्टन चौकात गस्त घालत होते.
त्यांना एक तरुण संशयित रित्या फिरतांना आढळून आला. त्यांनी त्याची चौकशी केली असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलीस नाईक जोसेफ साळवी, पोलीस नाईक विरप्पा करमल, पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी ढाकणे, सचिन गणगे, दीपक किल्लेदार यांनी त्याचा पाठलाग करुन त्याला जेरबंद केले. या तरुणाची झडती घेतली असता त्याच्या कंबरेला एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस आढळून आले.
चौकशी केली असता या आरोपीचे नाव इम्तियाज उर्फ बबलू अजित शहा (वय 24) असे असून तो काझीबाबा रोड, बाबरपूरा, चौक, वॉर्ड नं. 2, श्रीरामपूर येथील आहे. हा एक कट्टर गुन्हेगार असून त्याच्याविरुध्द श्रीरामपूर पोलीस ठाण्यात अपहरण व खंडणीसारखे गुन्हे दाखल आहेत. तो येवला येथे अपहरण व खंडणी गुन्ह्यातही आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी ढाकणे यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नं. सेकंड 70/2017 प्रमाणे इम्तियाज उर्फ बबलू अजित शहा याचेविरुध्द भादंवि कलम आर्म अ‍ॅक्ट 3/25, अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दळवे करत आहेत.

LEAVE A REPLY

*