फटाके वाजविले; श्रीरामपुरात तणाव

0
श्रीरामपूर (प्रतिनिधी) – भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या महामुकाबल्यामध्ये भारतीय संघाला 180 धावांनी दारूण पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे याचे पडसाद पुणे व अन्य ठिकाणी चाहत्यांनी संताप व्यक्त केला. पण श्रीरामपुरात एका भागात फटाके वाजविल्याच्या कारणावरून तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. ही घटना रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली.
हा सामना झाल्यानंतर एका भागात फटाके वाजविल्याचे सांगण्यात येते. शिवाजीरोडवरील सावता चौकात काही तरूण बसलेले होते. त्याचवेळी काही तरूण मोटारसायकलवर येथे आले. त्यांना या तरूणांनी मारहाण केली. त्यामुळे मारहाण करण्यात आलेल्या तरूणांनी ही माहिती आपल्या समर्थकांना दिली. त्यातून तणाव वाढला. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सावता रोड येथील तरूणांनी घडलेली हकिकत पोलिसांच्या कानावर घातली. त्यानंतर पोलिसांनी दुसर्‍या वॉर्डातून इकडे आलेल्या तरूणांचा पाठलाग सुरू केला तेव्हा हे तरूण मोटारसायकल सोडून पसार झाले. या मोटारसायकली पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.

LEAVE A REPLY

*