श्रीगोंद्यातील 18 ग्रामपंचायतींचे निवडणुकीचे बिगुल वाजले

0
श्रीगोंदा (प्रतिनिधी) – श्रीगोंदा तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या 18 ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. या 18 गावातील कार्यकर्ते निवडणुकीला सज्ज झाले आहेत. या ग्रामपंचायतीमध्ये माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या काष्टी तर आ. अरुण जगताप यांच्या बनपिंप्री तसेच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भोस यांच्या गावाचा समावेश आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील 18 ग्रामपंचायत निवडणुकांची कार्यकाळ संपत असल्याने या 18 गावच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली आहे. राजकीयदृष्टया महत्त्वाच्या असणार्‍या या ग्रामपंचायती आहेत. तालुक्यातील राजकीय नेत्यांमध्ये आ. राहुल जगताप, माजी मंत्री बबनराव पाचपुते, माजी आमदार शिवाजीराव नागवडे याच तीन नेत्याच्या भोवती राजकारण फिरत असल्याने या ग्रामपंचायत निवडणुकीमध्येेही राजकीय घमासान पाहण्यास मिळणार आहे. या गावातील कार्यकर्ते आतापासून तयारीला लागले असल्याचे दिसत आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भोस यांचे घोगरगाव हे गाव आहे.
आमदार अरुण जगताप यांचे बनपिंप्री, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अणासाहेब शेलार यांचे बेलवंडी गावाचा आहे, पंचायत समिती सभापती पुरुषोत्तम लगड यांच्या कोळगाव, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष माजी सभापती हरिदास शिर्के आणि विद्यमान पंचायत समिती उपसभापती प्रतिभा झिटे यांचे पेडगाव, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य पंचशीला गिरमकर यांचे आंनदवाडी गाव, तर माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या काष्टी गावाची निवडणूक होत आहे.
30 जून रोजी प्रारूप प्रभाग रचना व अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासप्रवर्ग याबाबत आरक्षण तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समितीने मान्यता व या समितीच्या सदस्याच्या सह्या 3 जुलै रोजी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्धीस देण्यात येणार आहे. 4 जुलै रोजी प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती मागविण्यात येणार आहेत.
या निवडणूक होणार्‍या ग्रामपंचायती मध्ये चवरसांगवी, घोगरगाव, तरडगव्हाण, थिटेसांगवी, बनपिंप्री, तांदळी दुमाला, माठ, बेलवंडी बुद्रुक, काष्टी, पारगाव सुद्रिक, टाकळी लोणार, देवदैठण, आनंदवाडी, कोळगाव, मढेवडगाव, पेडगाव, अधोरेवाडी, विसापूर याच्या निवडणूक आहेत

LEAVE A REPLY

*