गुजरातमधील भाविकांच्या वाहनाला ठाणापाड्याजवळ अपघात

0
ठाणापाडा | सापुतारा-हतगड रस्त्यावर ठाणापाड्याजवळ वाघदेव वळण परिसरात चालकाचा ताबा सुटल्याने गुजरात येथील वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या चारीत गेली.

मारुती सुझीकी अल्टाे सापुताऱ्याकडे जात होती. पहाटे तीन वाजेच्या सुमारास या परिसरात दाट धुके पसरले होते. चालकाला येथील वाघदेव वळणाचा धुक्यामुळे अंदाज आला नाही.

त्यामुळे वाहन रस्याच्या कडेला चारीत शिरले. या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. वाहनातील प्रवाशी सुरत गुजरात येथून शिर्डीला जात होते अशी माहिती प्रतिनिधीकडून  मिळाली आहे.

LEAVE A REPLY

*