शिर्डी, पंढरपुरात ‘नोगा’ प्रॉडक्टचे स्टॉल उभारणार

0

कृषी मंत्री फुंडकर यांची माहिती

मुंबई-महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळामार्फत राज्यातील शिर्डी, पंढरपूर व शेगाव या धार्मिक ठिकाणी तसेच राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळामार्फत लवकरच ‘ नोगा’प्रॉडक्टचे स्टॉल उभारण्यात येतील अशी माहिती कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली.
याबाबत मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, लवकरच जम्मु काश्मीर व हिमाचल प्रदेशाशी टायअप करुन तेथील रेड चेरी उत्पादन आयात करण्याचे तर महाराष्ट्रातील आंबा, संत्री या फळपिकांवर उत्पादन प्रक्रिया करुन त्या राज्यांना निर्यात करण्याचे प्रस्तावीत आहे. तसेच नोगाची उत्पादने भारतीय रेल्वेत उपलब्ध व्हावीत यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी तात्काळ बोलणी करण्यात येईल असे सांगून नोगाने मागणीनुसार उत्पादनाचा पुरवठा करावा असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
सध्या नोगामार्फत जॅम, स्क्वॅश, सिरप, ज्युस, टोमॅटो केचप सॉस तसेच अननस व इतर उत्पादनाची निर्मिती व विक्री करण्यात येते. नोगा उत्पादनाच्या विक्रीबाबतचे भविष्यकालीन नियोजन, स्टॉल उभारणे, नोगा ब्रँड वापरण्याबाबतचा इतर कंपनीशी करार, घाऊक बाजारपेठ सर्वेक्षण त्याचबरोबर वितरण प्रक्रिया आदी प्रश्नांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.

 

LEAVE A REPLY

*