Friday, April 26, 2024
Homeनगरशनीशिंगणापूर कोव्हिड सेंटर येथे रॅपिड अ‍ॅन्टीजेन चाचण्यांची सुविधा

शनीशिंगणापूर कोव्हिड सेंटर येथे रॅपिड अ‍ॅन्टीजेन चाचण्यांची सुविधा

सोनई (वार्ताहर) –

नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर कोव्हिड सेंटर अंतर्गत करोना अ‍ॅन्टीजेन रॅपिड टेस्ट शनिशिंगणापूर येथील भक्तनिवासमध्ये

- Advertisement -

सुरू करण्यात आली असल्याची माहिती सोनई प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र कसबे यांनी दिली.

पूर्वी नेवासा तालुक्यात नेवासा कॉलेजसमोर मुलींच्या वसतिगृहात अ‍ॅन्टिजेन टेस्टची सुविधा होती. यामुळे ग्रामिण भागातील पेंशटला तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत होते.किंवा काही जण नगर येथे स्वॅब करोना टेस्ट करण्यासाठी जावे लागत असल्याने पेंशटचे हाल होत होते. आता नेवासा आरोग्य विभागाने तालुक्यातील नऊ ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत रॅपिड अ‍ॅन्टिजेन करोना टेस्ट सुरू करण्यात आल्या आहेत.

आता नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर येथे नेवासा आरोग्य विभागाने करोना टेस्टिंगची सुविधा सुरू केली आहे. करोनाची लक्षणे दिसत असल्यास परिसरातील नागरिकांनी आपल्या जवळच्या सोनई प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत शनिशिंगणापूर कोव्हिड सेंटर भक्तनिवास येथे येऊन करोना अ‍ॅन्टीजेन टेस्टसाठी नाव नोंदणी करावी. असे आवाहन आरोग्यधिकारी डॉ.राजेंद्र कसबे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या