TWEETS : ‘जब हॅरी मेट सेजल’ सिनेमाचे पोस्टर रिलीज

0
शाहरूख खान आणि अनुष्का शर्मा यांचा आगामी सिनेमा ”जब हॅरी मेट सेजल”चे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.
इम्तियाज अली दिग्दर्शित या सिनेमाचं पोस्टर शाहरूख आणि अनुष्कानं आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केले आहे.
शाहरूख आणि अनुष्काच्या या सिनेमाचं नाव ”द रिंग” असल्याची चर्चा होती, त्यानंतर ”रहनुमा” असेल अशी माहिती समोर आली. पण अखेर ”जब हॅरी मेट सेजल” असे सिनेमाचं नाव निश्चित करण्यात आले आहे.
इम्तियाज दिग्दर्शित या सिनेमात शाहरूख खान आणि अनुष्का शर्माची मुख्य भूमिका आहे.
शाहरूखसोबत अनुष्काचा हा तिसरा सिनेमा आहे.
”जब हॅरी मेट सेजल” हा एक रोमाँटिक सिनेमा आहे, ज्यात दोन वेगवेगळ्या देशात राहणारे म्हणजेच हॅरी (शाहरूख) आणि सेजल (अनुष्का) यांना एकमेकांसोबत प्रेम होते.
दरम्यान, सिनेमाचा ट्रेलर सलमान खानचा सिनेमा ट्युबलाइटच्या प्रदर्शनावेळी रिलीज करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

*