रोटरीच्या शाडू माती गणपती कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद; पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

0

नाशिक | प्लास्टर ऑफ पॅरिसचे प्रदूषण रोखण्यासाठी ’रोटरी क्लब, नाशिकतर्फे शगुन लॉन्स, मते नर्सरी येथे रविवारी गणपती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल होतेे. यावेळी डॉ. श्रिया कुलकर्णी आणि स्नेहा वाणी यांनी मुलांना गणपती बनविण्याचे प्रशिक्षण दिले.

नाशिक शहरातील अबालवृद्धांनी या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळेला भरघोस प्रतिसाद दिला. या कायशाळेत सुमारे पाचशेहून अधिक अबालवृध्द सहभागी झाले. नाशिकमधील डॉ. श्रिया कुलकर्णी यांनी केलेल्या सूत्रबध्द मार्गदर्शनामुळे अनेकांनी गणेशमूर्ती निर्मितीचा आनंद अनुभवला. अत्यंत सोप्या पध्दतीने त्यांनी मार्गदर्शन केले.

शाडू मातीमध्ये पाणी किती प्रमाणात मिसळावे, आकार देताना माती किती म्ळिून घ्यावी यासह हात, पाय, कान यांचे विविध आकार कशाप्रकारे तयार करावेत याबाबत त्यांनी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. बाहेर मिळणार्‍या गणेश मूर्तीप्रमाणेच आकर्षक मूर्ती आपणही बनवू शकतो असा आत्मविश्वास अनेकांच्या चेहर्‍यावर कार्यशाळेनंतर दिसत होता.

या उपक्रमाचे प्रमुख संयोजक म्हणून मंथ लीडर रोटे जयश्री पटेल आणि रोटे आनंद कोठारी यांनी काम पाहिले.
या कार्यशाळेत सहभागी झालेल्यांमध्ये लहान मुलांची संख्या मोठी होती. लहान मुले गणपतीची मूर्ती बनविण्यात दंग झाली होती तर अनेकांचे पालक त्यांची मदत करण्यात दंग झाले होते. कोणी माती मळायला मदत करीत होते, तर कोणी माती मळत असलेल्या विविध आकार करून देण्यास मदत करीर होते.

पर्यावरण संवर्धनासाठी शाडू मातीच्या मूर्ती बनविण्याचा ’रोटरी क्लबचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. इको फ्रेंडली गणेशमूर्ती बनवल्याने पर्यावरण रक्षणासाठी हातभार मिळत आहे. अशी कार्यशाळा दरवर्षी आयोजित करावी अशी अपेक्षा यावेळी अनेकांनी व्यक्त केली. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी सचिव रोटे मनिष चिंधडेे, अध्यक्ष दिलीपसिंग बेनिवाल, विभावरी कोठावदे, मंगेश अपशंकर, विवेक व रुपाली जायखेडकर गौरव सामनेरकर, डॉ. राजेंद्र नेहेते, पराग जोशी आदींनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

*