#Screenplay : VIDEO : आता पटकथा लिहिण्यासाठीही सॉफ्टवेअर!

0

सिनेमा, नाटक, दूरचित्रवारी मालिका आदींच्या पटकथा लिखाणासाठी ‘फायनल ड्राफ्ट 10’ हे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे.

सॉफ्टवेअर आता तंत्रज्ञानातच वापरले जात नसून जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये याचा वापर सुरू झाला असून याला नाटक/सिनेमाचाही अपवाद नाही.

नाटक/सिनेमा क्षेत्रामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे पटकथा.

कोणत्याही उत्तम कलाकृतीमध्ये चांगल्या दर्जाची पटकथा आवश्यक असते. आता या प्रकाराला तंत्रज्ञानाची जोड मिळाली आहे. या अनुषंगाने सध्या हॉलिवुडसह जगभरातील चित्रपट निर्मिती आणि दूरचित्रवाणी मालिकांसाठी फायनल ड्राफ्ट १० या सॉफ्टवेअरचा उपयोग केला जात आहे.

यामध्ये उत्तम दर्जाच्या पटकथा लिखाणासाठी आवश्यक असणारे सर्व फिचर्स आहेत. यामध्ये कोणत्याही कच्च्या कथानकाला हॉलिवुड स्टाईल पटकथानकात परिवर्तीत करण्याची सुविधा आहे. यात कोणत्याही लिखाणाच्या पेजीनेशन आणि व्याकरणात्मक चुका सुधारण्यापासून ते त्याला सृजनशील पध्दतीत सादर करण्याची सुविधा आहे. यामध्ये हॉलिवुडच्या 100 प्री-इन्टॉल्ड थीम्स आहेत. म्हणजे कुणाला गुन्हेगारीवर आधारित पटकथा लिहावयाची असल्यास यासाठीची कच्चा मसाला असणारी थीम यामध्ये असेल.

यात आपण हव्या त्या पध्दतीने कथानक विकसित करून उत्तम पटकथा निर्मित करू शकतो.

समजा एखाद्या पटकथेवर एकापेक्षा जास्त लेखक काम करत असतील तर त्यांचे काम अगदी रिअल टाईम पध्दतीने संलग्न करण्याची सुविधा यात देण्यात आली आहे. यात स्टोरी मॅप हे अभिनव फिचर असून याच्या मदतीने अत्यंत परिणामकारक संवाद, वेगवेगळी दृश्ये आदींमध्ये परिणामकारकता साधणे शक्य आहे.

फायनल ड्राफ्ट 10 या सॉफ्टवेअरची मूळ किंमत 249 डॉलर्स असली तरी सध्या ते सवलतीच्या दरात म्हणजेच 149 डॉलर्सला उपलब्ध करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे याच्या ताज्या आवृत्तीत काही नवीन फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*