बीएसएनएलतर्फे ‘पाणी वाचवा’ अभियान

0
नाशिक | दि.१६ प्रतिनिधी- बीएसएनएल टेलीकॉम वुमेन्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने पाणी वाचवा अभियानांतर्गत जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मायको सर्कल येथील संचार भवन येथून धनश्री हरदास यांच्या हस्ते फीत कापून या रॅलीस प्रारंभ झाला.

मायको सर्कल, तिडके कॉलनी, चांडक सर्कल मार्गे गोल्फ क्लब मेैदान मार्गे ही रॅली काढण्यात आली. यावेळी गौरी कोरडे यांच्या पथकाने पाणी वाचवा याविषयावर पथनाट्य सादर केले. यावेळी बीएसएनएलच्या विविध योजनांबाबतही या रॅलीतून माहिती देण्यात आली.

या उपक्रमात बीएसएनएलचे महाप्रबंधक नितीन महाजन यांनी सहभाग घेतला.  अधिकारी, कर्मचारी या रॅलीत सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

*