Photo Gallery : सावरकर स्मारकदर्शन मंदिरापेक्षा पवित्र – मुख्यमंत्री

0

भगूर :  भगूरकर भाग्यवान आहेत, सावरकरवाङा मंदीर आहे. सावरकर स्मारक दर्शन मंदिरापेक्षा पवित्र असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते भगूर येथे  सावरकर जयंतीउत्सवासाठी सावरकरवाड्यात अभिवादणासाठी आज नाशकात आले त्यावेळी ते बोलत होते.

याठिकाणी शिवसेना नगरसेवकांना वाड्यात प्रवेश नाकारल्यामुळे काही काळ याठिकाणी तणाव होता. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी आलेल्या शेतकऱ्यांसह सर्वांचीच कसून चौकशी करून प्रवेश देण्यात आला.

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौर्यावर आहेत. सकाळी आल्यानंतर त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भगूर येथील सावरकरवाड्याला भेट देऊन अभिवादन केले. पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, लोकप्रतिनिधींसह अनेकांची उपस्थिती होती.

कॉंग्रेसने सावरकरांना स्वीकारले नाही. सावरकर यांच्यावर कायम अन्याय झाला 1947 च्याआधी ब्रिटिशांनी अन्याय केला त्यानंतर राजकारण्यांनी अन्याय केला त्या कालच्या राज्यकर्त्यांना सावरकर यांच्या प्रतिभेतून आपण झाकोळून जाऊ ही भीती होती म्हणू  त्यांनी सावरकरांना कधी मोठे होऊ दिले नाही.

त्यांच्या काव्य पंक्ती एक नालायक मंत्र्याने काढून टाकलेत, एसीच्या गाड्यातून फिरणाऱ्या या मंत्र्यांनी दहा दिवस तरी अंदमानला जाऊन राहावे मुख्यमंत्री यांनी नाव न घेता काँगेस आणि मणी शँकर अय्यर यांच्यावर टीका केली.

यावेळी व्यासपीठावर एकनाथ शेटे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड , सचिन ठाकरे , बाळासाहेब सानप रंजना भानसी, कैलास गायकवाड, खासदार  हरिश्चंद्र चव्हाण, तानाजी करंजकर नगराध्यक्ष अनिता करंजकर मनीषा कस्तूरे कॅ.बोर्ड उपाध्यक्ष  दिनकर आढाव  आदिंची उपस्थिती होती.

हे आहेत मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील मुख्य मुद्दे

– मंदिरात गेल्यावर येते त्यापेक्षा पवित्र भावना मला सावरकर वाड्यात गेल्यावर जाणवली.
– सावरकर व्यक्ती नव्हे संस्था होते.
– सशस्त्र क्रांतीच्या लढ्याला सर्वोतोपरी मदत सावरकरांची.
– सावरकर तेज पुरुष होते, क्रांतिकारकांची वसाहत तयार केली.
– रोटी बंदी, बेटी बंदी, परदेश बंदी सावरकरांनी उठवली.
– 1857चा लढा सैनिकांच बंड नाही स्वतंत्र युद्ध होत हे सावरकरांनी सर्वप्रथम समाजाला सांगितलं
– मराठीतले अनेक शब्द सावरकरांची देणगी.
– 1947 आधी इंग्रजांनी आणि नंतर स्वकीयांनी सावरकरांवर अन्याय केले.
– सावरकरांना देशद्रोही ठरवणारे अनेक वर्षे सत्तेत मंत्री होते. लोकांनी घालवले.

LEAVE A REPLY

*