शेंडी आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

0

अकोले – तालुक्यातील शेंडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी यांची आजारी रजा मंजूर करून पगार काढण्यासाठी तक्रारदार यांच्याकडून 1 हजार 500 रुपये लाच घेतांना वैद्यकिय अधिकारी डॉ. आबासाहेब लक्ष्मण काकडे यांना लाचलुपच विभागाने रंगेहात पकडले.

ही कारवाई अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने आज करण्यात आली. तक्रारदार यांचे 31 जुलै ते 7 ऑगस्ट 2017 या कालावधीमधील वैद्यकिय कालावधी सिक रजा म्हणुन मंजूर करून त्या कालावधीमधील पगार काढण्यासाठी तक्रारदार यांच्याकडून 1 हजार 500 रुपयाची लाच साक्षिदारासमक्ष शेंडी येथील बाळासाहेब नारायण लोहगावकर यांचे भाडोत्री घरामध्ये लाच स्विकारतांना रंगेहात पकडले.

LEAVE A REPLY

*