सार्वमत कृषी खरेदी महोत्सवास भरघोस प्रतिसाद

0
अहमदनगर (प्रतिनिधी)- दरवर्षीप्रमाणे खात्रीशीर आणि मनसोक्त खरेदीचा आनंद देणार्‍या सार्वमत कृषी महोत्सवास जिल्ह्यातून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. नावीन्यपूर्ण, दर्जेदार उत्पादने आणि विशेष सवलती देणार्‍या या प्रदर्शनात गेल्या 10 दिवसांपासून ग्राहकांनी खरेदीचा मनसोक्त आनंद लुटला. 18 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार्‍या या कृषी प्रदर्शनाचा लाभ मिळू शकणार आहे.
25 जून पासून सुरू झालेल्या सार्वमत कृषी खरेदी महोत्सवाचे प्रायोजक पारस उद्योग समुह व अहमदनगर जिल्हा परिषद आहे. तर सहप्रायोजक जयकिसान ट्रॅक्टर्स परिवार संगमनेर, अश्‍वमेध अ‍ॅग्रो केमिकल प्रा.लि, कोपरगाव आहे. 55 दिवस चालणार्‍या या खरेदी महोत्सवात शेतकर्‍यांना शेती साहित्य खरेदीतून लाखो रूपयांची बक्षिसे मिळणार आहे.
खरेदी महोत्सवात बंपर बक्षिस 1 बुलेट, 1 रोटावेअर, 2 सबमर्सियल पंप, 2 कडबा कुट्टी यंत्र, 15 पाठीवरील औषध पंप, 10 स्पे युनिट, 50 प्लॅस्टिक कॅरेट, 20 एल.ई.डी टॉर्च आदी बक्षिसांचा समावेश आहे.
या योजनेत किसान कॉर्पोरेशन (कॉटेज कॉर्नर, अहमदनगर), आशिर्वाद पाईप्स प्रा.लि., अजय अ‍ॅग्रीटेक, नेवासेकर पेट्रोल पंपासमारे (अहमदनगर), स्वामी स्प्रिक्लर्स (कोपरगाव), सागर पंम्पस अ‍ॅण्ड स्पेअर्स (कोल्हार), पवन फर्टीलायझर्स मार्केटयार्ड (अहमदनगर),
साईपूजा फॅब्रीकेशन, पिंपळस (राहाता), गौरीनंदन दूध संकलन केंद्र टाकळीभान (श्रीरामपूर), एव्हरग्रीन मृदूला अ‍ॅग्रो प्रा.लि. (कोल्हार), शेतकरी कृषी सेवा केंद्र, कृषी कल्पतरू अ‍ॅग्रो (राहाता), वाबके पाटील, डाळिंब नर्सरी (राहाता), कल्याणी कृषी सेवा केंद्र, कृष्ण कल्पतरू अ‍ॅग्रो (राहाता), न्यू हरितक्रांती कृषी सेवा केंद्र (पुणतांबा), माऊली कृषी सेवा केंद्र मानोरी (राहुरी), श्रीसाई ट्रॅक्टर्स अ‍ॅण्ड टायर्स नगर-मनमाड रोड (राहुरी), मू. उंडे पाटील अ‍ॅग्रो (श्रीरामपूर), रेणुका अ‍ॅग्रो पाथरे खुर्द (राहुरी), सुलभ इरिगेशन राहुरी कॉलेजजवळ नगर-मनमाड रोड (राहुरी),
श्रीराज अ‍ॅग्रो गुहा (राहुरी), माऊली कृषी केंद्र म्हैसगाव (राहुरी), सुखशांती इलेक्ट्रीकल अ‍ॅण्ड हार्डवेअर अ‍ॅण्ड मशिनरी स्टोअर्स सात्रळ (राहुरी), सुयोग कृषी सेवा केंद्र कोतुळ (अकोले), सोमनाथ कृषी सेवा केंद्र निमगाव पागा (संगमनेर), राजश्री कृषी सेवा केंद्र वाघापूर (संगमनेर), भूमिपुत्र अ‍ॅग्रो क्लिनिक चंदनापुरी (संगमनेर), संकेत इलेक्ट्रीकल अ‍ॅण्ड हार्डवेअर चांदा (नेवासा), त्रिमुती कृषी सेवा केंद्र वडाळा (नेवासा), कैलास कृषी सेवा केंद्र घोडेगाव (नेवासा), किसनगिरीबाबा कृषी सेवा केंद्र देवगडफाटा (नेवासा), ग्रीनगोल्ड अ‍ॅग्रो सर्व्हिसेस घोडेगाव (नेवासा), अहिल्यादेवी दूध संकलन केंद्र भोकर (श्रीरामपूर) या दुकानांचा योजनेत समावेश आहे.

 

LEAVE A REPLY

*