अहमदनगर : महिलांच्या समस्यांकडे भाजपा सरकारचे दुर्लक्ष : आ. निलम गोर्‍हे

महिला अत्याचारांच्या गुन्ह्यात वरिष्ठ न्यायालयात जलदगतीने सुनावणी व्हावी आ. नीलम गोर्‍हे : नगरच्या कौटुंबिक न्यायालयात लक्ष घालण्याचे आश्‍वासन

0

अहमदनगर : महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात जिल्हा न्यायलयात सुनावणी होवून शिक्षा झाल्यानंतर आरोपी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात अपील करतात. या ठिकाणी सुनावणी उशीर होत असल्याने आरोपींच्या शिक्षेला विलंब होत असल्याने, वरीष्ठ न्यायालयातही जलदगती (फास्ट ट्रॅक) सुनावणी व्हावी, अशी अपेक्षा शिवसेना उपनेत्या आमदार डॉ. नीलम गोर्‍हे यांनी नगरमध्ये व्यक्त केली.
नगरच्या शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत आ. गोर्‍हे बोलत होत्या. 2001 मध्ये घडलेल्या कोठेवाडी प्रकरणात आरोपींना 13 वर्षांनी सर्वोच्च न्यायालयात शिक्षा झाली. या प्रकारणात जिल्हा पातळीवर 5 वर्षात शिक्षेवर शिक्कामोर्हतब झाला होता. यामुळे वरिष्ठ न्यायालयातही महिलांवरी अत्याचाराच्या प्रकरणात जलद गतीने सुनावणी होवून आरोपींना शिक्षका व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. संरक्षण विभागातील महिलांवर नागरिकांकडून अत्याचार झाल्यावर पीडीतेला वैद्यकीय सुट्टी मिळत नाही. त्यामुळे संरक्षण खात्यासह सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात अत्याचारात शारीरिक दुखापत झालेल्या पीडितांना रजा आणि अन्य वैद्यकीय मिळावी, अशी मागणी त्यांनी केली. हा विषय केंद्र सरकारशी निगडीत असून सेनेच्या खासदारामार्फंत त्यावर आवाज उठवण्यात येणार आहे.
पोक्सो न्यायालयात लहान मुले आणि मुलींना अश्वासक वातावरण असावे, यासाठी बालकांची व्हिडिओ कॉन्फरन्सने साक्ष होण्याची गरजे आहे. याकडे न्याय व्यवस्थेने लक्ष देणे आवश्यक आहे. राज्यात 2014 पूर्वी गुन्हेगारी घटनांमध्ये दोषसिद्धीचे प्रमाणे अवघे साडेतीन टक्के होते़ सध्या मात्र हे प्रमाण 57 टक्के आहे़ पोलीसांनी संवेदनशीलपणे काम केले तर सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल़ पीडित महिलांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून नयेत़, असे आव्हान गोर्‍हे यांनी यावेळी केले़
महिलांच्या समस्येवर सभागृहात महिला आमदार कमी असून मी एकटे पडली आहे. महिला आमदारांनी या विषयावर सरकारकडे पाठपुरावा करण्याची गरज आहे. सरकारच्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनाकडे गंभीरतेने पाहण्याचा दृष्टीकोनाचा अभाव आहे. सरकारला बुलेट ट्रेन ला पैसा आहे. मात्र महिलांच्या समस्यांकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. नगर येथे कौटुंबिक न्यायालयाचे कामकाज तातडीने पूर्ण करण्यात यावे यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे गोर्‍हे यांनी सांगितले़

………………

LEAVE A REPLY

*