शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन : अरविंद पारगावकर

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन असून ग्रामीण भागातील मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी धडपडणार्‍या शाळांना ‘लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो’ कंपनीच्यावतीने सुविधा निर्माण करण्यासाठी भरीव सहकार्य केले जाईल अशी ग्वाही कंपनीचे सहसरव्यवस्थापक अरविंद पारगावकर यांनी दिली.

नगर तालुक्यातील विळद येथील ज्ञानगंगा विद्यालय येथे शुक्रवारी 24 नोव्हेंबर रोजी नवीन वर्गखोल्या, किचन शेड, शुद्ध पेयजल योजना व कार्यालयाचे उद्घाटन नगर ‘एमआयडीसी’तील लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो कंपनीचे सहसरव्यवस्थापक अरविंद पारगावकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी डॉ. बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शामराव निमसे होते.‘लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो’ कंपनीच्यावतीने ज्ञानगंगा विद्यालयाला सुमारे साडेबारा लाखांचा निधी देण्यात आला. या निधीतून विविध सुविधांबरोबरच विद्यालयाच्या इमारतीचे नूतनीकरणही करण्यात आले.
पारगावकर म्हणाले की, ज्ञानगंगा विद्यालयाला मॉडेल स्कूल बनविण्यासाठी 5 वर्षांचा आराखडा तयार करून विविध शैक्षणिक प्रकल्प राबविण्यात येतील. त्यात संगणक शिक्षण, शिक्षक प्रशिक्षण, मुलींसाठी विशेष मदत आदी बाबींचा समावेश असेल. नगर तालुक्यात कंपनीच्यावतीने पिंपळगाव माळवीसह 17 शाळांना शुद्धपेय जलयोजनेसाठी निधी देण्यात आला आहे व विविध उपक्रम राबवून आर्थिक सहाय्य करण्यात आलेले आहे.
अध्यक्षीय भाषणात शामराव निमसे म्हणाले, शाळेच्या विकासासाठी राहुरी सहकारी साखर कारखानाही मदत करील. विविध मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
सरपंच मनीषा बाचकर, रासपचे संजय बाचकर, शाळा समितीचे अध्यक्ष विजय अडसुरे, कॅप्टन दिगंबर शिंदे, माजी शिक्षक भास्करराव पगारे, अबासाहेब पवार, शिवाजीराव अडसुरे, सागर पगारे, ‘लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो’ कंपनीचे वृषभ फिरोदिया, संतोष निकम, ए. बी. पारखे, यशवंत जोशी, शेखर देशमुख आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
पत्रकार व माजी प्रा. वसंतराव जगताप, पिंप्री घुमटचे सरपंच रभाजी सूळ, ग्रामपंचायत सदस्य संदीप जगताप, प्रा. अतुल अडसुरे यांनी मनोगत व्यक्त केले.
मुख्याध्यापक दादासाहेब चोथे यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन शिक्षक अशोक मोरे यांनी केले. संयोजन बापूसाहेब जगताप यांनी केले तर शिक्षक बाळासाहेब दुधाट यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

*